दैनिक स्थैर्य | दि. २७ मे २०२३ | फलटण |
मलठण (ता. फलटण) येथील जिंती नाक्यावर असलेल्या ‘ब्रम्हचैतन्य टिंबर’ नावाच्या दुकानात छतावरून प्रवेश करून अज्ञात चोरट्याने सुमारे ३८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या चोरीची फिर्याद अमोल विलास चौधरी (रा.चौधरवाडी, ता.फलटण) यांनी फलटण शहर पोलिसात दिली आहे.
या चोरीची अधिक माहिती अशी, दि. २५ मे २०२३ रोजी मलठण (ता. फलटण) येथील जिंती नाक्यावर असलेल्या ‘ब्रम्हचैतन्य टिंबर’ नावाच्या दुकानात छतावरून आत प्रवेश करून २२ हजार २०० रुपयांची रोकड, १ हजार रुपये किमतीची एक कटर मशीन व १५ हजारांचे खिळे मारण्याचे गन मशीन असा एकूण ३८ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
या चोरीचा अधिक तपास घाडगे करत आहेत.