
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, दुधेबावी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद येथील मल्हार आर्मी संस्थेचे अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी आँनलाईन फेसबुक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये फलटण येथील मोनलताई शिंत्रे यांनी भाग घेतला होता. त्यांना यामध्ये राज्यातून तिसरा क्रमांक मिळाला आहे. यामध्ये त्यांना १४४५ लाईक्स , वीव्ज साडेबारा हजार , कमेंट साडेसहाशे मिळाल्या आहेत. अहिल्यादेवी होळकर आणि आजची स्त्री या विषयावर त्यांनी व्याख्यान केले होते. भारतीय जनता पक्षाच्या किसान महिला मोर्चाच्या फलटण तालुका अध्यक्षा सौ. कल्पनाताई गिड्डे यांच्या त्या कन्या आहेत. त्यांनी याअगोदरही अनेक वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होऊन यश मिळवले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे समस्त फलटणकरांमधून अभिनंदन होत आहे.
