ठाकरे सरकारविरोधात साताऱ्यात ‘मनसे’ आक्रमक; ऊर्जामंत्र्यांना ‘झटका’ देणार?


 

स्थैर्य, सातारा, दि.२६ : कोरोनाच्या काळातील ग्राहकांचे वीजबिल माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज आंदोलन करण्यात आले. या वेळी मनसेचे शहराध्यक्ष राहुल पवार, धैर्यशील पाटील, युवराज पाटील, महिला आघाडीच्या सुनीता शिंदे आदी उपस्थित होते. 

कोरोनाच्या काळातील वीजबिल ग्राहकांना भरमसाठ प्रमाणात आले आहे. याबाबत संबंधित विभागाने ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आदेश दिले आहेत. ग्राहकांनी वापरापेक्षा जास्त प्रमाणात वीजबिले आल्याने ग्राहकांची आर्थिक लूट होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. वीजबिल माफ करण्याबाबत लवकरात-लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभरात तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेने दिला आहे.

मेढ्यात ऊर्जामंत्र्यांच्या दुटप्पी भूमिकेच्या निषेधार्थ वीज बिलांची होळी

सामान्य वीज ग्राहक संतापला असून आज बिले जाळली आहेत. पुढील काळात कनेक्‍शन तोडाल, तर संतापलेला सामान्य माणूस तोडणारालाही सोडणार नाही.” कोरोना काळात मिटर रीडिंग न घेताच ग्राहकांना अंदाजे बिले देवून वाढीव बिले दिली होती. ही बिले न भरता ग्राहक शासनाच्या निर्णयाकडे डोळे लावून बसले होते. पण, ऊर्जामंत्र्यांनी वीज ग्राहकांचा भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे सरकारने वीजबिलाबाबत त्वरित निर्णय घेऊन वीज बिल माफ करावे, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा मनसेने दिला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!