चौदाव्या वित्त आयोगातील निधीचा बरड ग्रामपंचायतीकडून गैरवापर; उप सरपंचासह सदस्यांचीच जिल्हा परिषद CEO कडे तक्रार


स्थैर्य, फलटण : तालुक्यातील बरड ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच व सदस्यांना विचारात न घेता चौदाव्या वित्त आयोगातून निधीच गैरवापर सरपंच व ग्रामसेवक केलेला आहे. तरी त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी बरड ग्रामपंचायतीचे उपसरपंच व सदस्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्याकडे केलेली आहे.

बरड ग्रामपंचायतीच्या सरपंच व ग्रामसेवक यांनी चौदाव्या वित्तआयोगातून रस्त्याच्या मुरुमाची परस्पर विक्री करणे. तसेच ग्रामपंचायत सदस्यांनी सुचवलेली कामे न करणे. मासिक सभेमधील ठरलेली कामे न करणे, त्याबददल विचारणा केली असता सदस्यांच्या अंगावर येणे. व्यासपीठ सोडून जाणे, स्वतःची वाहने लावून गैरप्रकार करणे. मुरुमाची रॉयल्टी न भरणे, चौदाव्या वित्त आगोयातील निधीचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करणे. चौदाव्या वित्त आयोग निधी विनापरवाना स्वतःच्या फायदयाच्या वळवणे. अश्या आशयाचे निवेदन बरड ग्रामपंचायतीचे उपसरपंच गोरख टेबंरे यांनी इतर सदस्यांच्या सहीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!