उद्या दि. 28 ऑगस्ट रोजी मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील फलटण दौऱ्यावर


दैनिक स्थैर्य | दि. 27 ऑगस्ट 2024 | फलटण | भारतीय जनता पार्टीचे नेते तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील हे उद्या दि. 28 ऑगस्ट 2024 रोजी फलटण दौऱ्यावर येत आहेत.

उद्या दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 8 वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील हे फलटण – सातारा रोडवरील भडकमकर नगर येथे असणाऱ्या केदार करवा यांच्या असणाऱ्या तेजम निवासस्थानी येणार आहेत. या ठिकाणी काही वेळ राखीव असून त्यानंतर मंत्री ना. पाटील हे माण तालुक्यातील गोंदवलेकडे मार्गस्थ होणार आहेत.

काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपलेली आहे. अशा मध्येच मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा फलटण दौरा हा महत्त्वपूर्ण ठरणार असल्याच्या चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगू लागले आहेत. यावेळी मंत्री ना. पाटील हे भारतीय जनता पार्टीच्या व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे.


Back to top button
Don`t copy text!