सोशल मिडीयावरुन मायलेकीचा विनयभंग; सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. १९ फेब्रुवारी २०२२ । सातारा । सोशल मिडीयाचा आधार घेत युवतीचे बनावट अकाउंट काढून एका विद्यालयातील युवकाने अल्पवयीन युवतीचा व तिच्या आईचा पाठलाग करत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी त्या युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, त्या युवकास अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खावली ता. सातारा येथील राहणारा विपुल विजय भोंडवे याने बनावट इन्स्टाग्राम सोशलचे अकाऊंट काढून समोरील अल्पवयीनला आपण स्वत: युवती असल्याचे भासवून चॅटिंग करत होता. याच दरम्यान, अश्लील फोटो, व्हिडीओ टाकून त्याअल्पवयीनच्या व तिच्या आईचा पाठलाग करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन दि.२१ नोव्हेंबर २०२१ ते दि.२० डिसेंबर २०२१ या दरम्यान केले. या सततच्या त्रासामुळे त्या युवतीच्या आईने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर विपुल याच्यावर पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!