दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ५ हजारांनंतर आता २ हजार रुपयांचा दुसरा हप्ता मिळणार?

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर ५ हजार रुपयांचा अग्रीम जमा झाल्यानंतर आता २ हजार रुपयांचा दुसरा हप्ता देण्याच्या हालचाली राज्य सरकारने सुरू केल्या आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ही मदत जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १७ नोव्हेंबर : राज्यातील ३०४ दुष्काळी तालुक्यांतील सुमारे १ कोटी पात्र बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दिवाळीपूर्वी ५ हजार रुपयांची अग्रीम मदत जमा करण्यात आली आहे. आता पुढील टप्प्यात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २ हजार रुपयांचा दुसरा हप्ता देण्याबाबत प्रशासकीय स्तरावर हालचाली वेगवान झाल्या आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला किंवा सभागृहातील दुष्काळी चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे.

दुष्काळी तालुक्यांत वाढ आणि केंद्राकडे सुधारित प्रस्ताव

सध्याच्या ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये आणखी १० तालुक्यांची भर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधीच्या मदत निकषांत वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारकडे सुधारित प्रस्ताव पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आठवडाभरात हा प्रस्ताव सादर केला जाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल.

ई-केवायसी पूर्ण करणाऱ्या उर्वरित शेतकऱ्यांनाही लाभ

राज्यातील १ कोटी १० लाख बाधित शेतकऱ्यांपैकी १ कोटी शेतकऱ्यांना पहिला हप्ता मिळाला आहे. उर्वरित १० लाख शेतकऱ्यांचे शेतकरी ओळख क्रमांक नसणे, सामाईक जमीन किंवा वारस नोंदी प्रलंबित असणे या कारणांमुळे मदत अडकली आहे. या शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करताच त्यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा केली जाईल, असे मदत व पुनर्वसन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव विनिता वेद सिंगल यांनी स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!