बारामती मध्ये त्या खासदारांची विकास कामानिमित्त भेट; राजकीय भेट ? विकासकामांची भेट चर्चेला उधाण


दैनिक स्थैर्य । दि.२७ मार्च २०२२ । बारामती । देशातील विविध राज्यातील खासदारांचे आज महाराष्ट्रातील बारामती येथे आगमन झाले, त्यांनी शनिवार 26 मार्च रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. बारामतीतील विकास कामाच्या पाहणीसाठीचा हा खासगी दौरा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या आमंत्रणावरून हे सर्वजण बारामतीत आल्याचे सांगण्यात येत आहे. बारामतीतील विविध विकास कामे,बारामतीच्या नियोजनबद्ध विकास आराखड्याची हे खासदार पाहणी करत आहेत. बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्या, महिला सक्षमीकरण, शेतीविषयक विविध प्रचार व प्रसार तंत्रज्ञान, शैक्षणिक विकास, साखर उद्योग अशा विविध बाबींची पाहणी केली.

‘ या’ ठिकाणी दिल्या भेटी

दौऱ्यासाठी बारामतीत उपस्थितत असलेल्या खासदारांनी आपल्या दौऱ्यामध्ये फेरेरो या आंतरराष्ट्रीय चॉकलेट कंपनीला भेट दिली आहे. याबरोबरच बारामतीत महिलांनी बांधलेल्या टेक्सटाइल पार्कला भेट देत तेथील महिलांच्या सोबत संवाद साधला आहे. शिक्षण संकुल विद्या प्रतिष्ठानलाही भेट देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार हे तिघेही स्वतः उपस्थित राहत विविध विकास कामांची माहिती देताना दिसून आले आहे., हे खासदार बारामतीला कृषी विज्ञान केंद्राने उभारलेल्या इनक्युबेशन सेंटर, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचा आढावा घेणार आहेत.

हा वैयक्तिक दौरा असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या दौऱ्यात तृणमूल काँग्रेस, बसपा आणि भाजप खासदारांचाच सहभाग आहे. त्यामुळे या बारामती दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

‘या’ खासदारांचा समावेश

बारामतीतील विकास कामाची पाहणी करण्यात आलेल्या खासदारांमध्ये विविध पक्षाच्या खासदारांचा समावेश आहे.   यामध्ये भाजपचे 5  तर विविध पक्षातील 12  खासदारांचा समावेश आहे. यावेळी या खासदारांनी बारामतीतल्या सर्व संस्थांना भेट देत केली विकासकामांची पाहणी केली. यामध्ये शिवकुमार उदासी, निशिकांत दुबे, दुष्यंत सिंग, सीएम रमेश या भाजप खासदारांचा समावेश आहे. तर सौगता रॉय (तृणमूल काँग्रेस), लवू कृष्णा देवरियालू (युवजन श्रमिक), रितेश पांडे (बसपा), विवेक गुप्ता (तृणमूल काँग्रेस) हे इतर चार खासदार आणि काही उद्योगतींचा समावेश आहे. दरम्यान हा अभ्यास दौरा असला तरी या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

एकीकडे पाचपैकी चार राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी सक्रिय झाले आहेत, अशी चर्चा रंगत आहे.अशा स्थितीत देशातील विविध राज्यातून भाजपचे पाच खासदार बारामतीत विकासकामे पाहण्यासाठी आले होते. ही राष्ट्रपती निवडणुकीची तयारी आहे का?


Back to top button
Don`t copy text!