कोयना विभागात बेसुमार वृक्षतोड

मोळ्यांचा साठा चक्क रस्त्यावर


दैनिक स्थैर्य । 24 जून 2025 । सातारा । सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेस असणार्‍या व्याघ्रप्रकल्प लगतच्या पाटण तालुक्यात ग्रीन कॉरिडॉर मध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. तर दुसरीकडे लाकडाच्या मोळ्यांचे रस्त्यावर साठे केलेले दिसत असून वनविभागाला ते दिसत नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. अटी व नियम धाब्यावर – बसवून पाटण तालुक्यातील लेंढोरी, -तळीचे, रिसवड, दाणकल येथे वृक्षतोड होत आहे. याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.

’झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश वन विभागाने सार्वजनिक ठिकाणी व भिंतीवर लिहिला आहे. निसर्ग सौंदयनि नटलेल्या कोयना विभागात वनविभागाच्या देखरेखीपेक्षा या ठिकाणी लाकडाची वखार आहे की काय? अशी शंका येते.

पाटण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली आहे. कोयना धरण व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे कोयना परिसराचे नाव जगाच्या नकाशावर पोहोचले. तर दुसर्‍या बाजूला वृक्षतोडीमुळे अनेक ठिकाणी सिमेंटचे जंगल उभे राहिलेले आहे.

कोयना खोर्‍यामध्ये आयुर्वेदिक क्षेत्रात महत्व प्राप्त झालेली अनेक औषधी व दर्मिळ झाडपाला आहे. याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रीन कॉरिडॉर असल्याने वन्यजीव वन्य पक्ष्यांचा अधिवास मोठ्या प्रमाणात आहे. वन्य प्राणी व पक्षी यांच्या नैसर्गिक साखळीचा घटक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मदत करीत आहे. मात्र यावरच सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कुर्‍हाडचालवली जात आहे. पश्चिम घाट, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, कोयना अभयारण्य व चांदोली अभयारण्य पर्यंत हा ग्रीन कॉरिडॉर आहे.पर्यावरणाच्या दृष्टीने समृद्ध असलेला हा भाग वन्यजीव व पक्षांसाठी महत्त्वाचा आहे. विविध पक्षांचे प्राण्यांचा मोठ्या प्रमाणात आधिवास या ठिकाणी आहे मात्र कोयना विभागात होणार्‍या वृक्षतोडीमुळे हा ग्रीन कॉरिडॉर सध्या धोक्यात आला आहे.त्यामुळे नियम धाब्यावर बसवून वृक्षतोड करणार्‍या लाकूड तस्करांवर कारवाई करावी. अशी मागणी पर्यावरण प्रेमी नेहमीच करत असतात. मात्र, कुन्हाडीचा दांडा गोतास काळ अशी वनविभागाची नवीन ओळख झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!