लोणंदकरांना माऊलींच्या आगमनाची आस


दैनिक स्थैर्य । 24 जून 2025 । सातारा । संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हज्जारी वारकप्यांसह पंढरीच्या वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झाला आहे. माऊलीचा पालखी सोहळा गुरुवार दि. 26 जून रोजी 1 दिवसाच्या मुक्कामासाठी लोणंद नगरीत विसावणार आहे. माऊली सोहळयातील वारकर्‍यांची, भाविकांची लोणंद मुक्कामी कसलीच गैरसोय होऊ नये यासाठी लोणंद नगरपंचायत, महसुल, पंचायत समिती, पोलीस, आरोग्य, बांधकाम, वीज वितरण विभाग गत 15-20 दिवसाफसून तयारी करत असून ही तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

पालखी तळ व नीरा दत्तघाट येथे माऊलीच्या स्वागताची जोरदार तयारी सुरु असून माऊलीच्या आगमनाची लोणंदकरासह सातारा जिल्हावासियांना आस लागली आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे गुरवार दि. 26 जून रोजी दुपारी 1 वाजता सातारा जिल्हयात आगमन होऊन पालखी सोहळ्याचा पहिला मुक्काम होणार आहे. पालखी सोहळ्यातील वारक-याची चांगली सोय व्हावी यासाठी पालखी तळ, पालखी मार्ग, नीरा घाट व लोणंद शहरात सुरु असलेली कामे अंतिम टप्यात आली आहेत. लोणंदमध्ये पालखी सोहळ्याच्या तयारीची कामे लोणंद नगरपंचायत, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, वीज वितरण कंपनी, पोलीस दल, महसूल विभाग आदी विभागाच्या वतीने 150 20 दिवसांपासून सुरु आहेत, पालखी काळामध्ये वारकरी व भविकांना चांगल्या सुविधा मिळाला यासाठी सर्वच शासकीय विभाग अलर्ट राहून कार्यरत आहेत.

पालखी मार्गावर आरोग्यविभागाच्या वतीने पिण्याच्या पाण्याच्या विहीरीचे पाणी नमुने तपासणे, त्या पाण्याचे जलशुध्दीकरण करणे, पाणी पिण्यायोग्य आहे की नाही ते फलक लावणे, शहरातील हॉटेल मधील पाणी तपासणी करणे आयी कामे सुरु करण्यात आली आहेत. वीज वितरण कंपनीच्यावतीने देखील पालखी काळात वीज पुरवठा खंडीत होऊ नये यासाठी लोणंद व परिसरातील वीज वाहिन्यांना अडचण करणारी झाडे झुडपे तोडण्यात आली आहेत. वीज पुरवठा करणार्‍या वाहिन्यांची तसेच विद्युत डीपीची दुरुस्ती करण्यात आली आहे. लोणंद नगरपंचायतीच्या वतीनेनगराध्यक्षा मधुमती गलिये, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी, सर्व नगरसेवक व मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी तळ तसेच लोणंद शहरातील मोकळ्या जागाची स्वच्छता करणे, बारकांना मुखलक पाणी पुरवठ्याची व्यवस्था करणे, शहरातील गटर्स,शौचालय व मुतार्‍याची स्वच्छता करणे, शहरातील रस्त्याची दुरुस्ती करणे, पालखी तळावर दर्शन रांग व विद्युत रोषणाई करणे, पालखी तळावर सपाटीकरण करून त्यावर कच टाकणे आदी कामे करण्यात येत आहेत. लोणंद मुक्कामी रस्ते, पाणी, वीज, इंधन, औषध आदी बाबीची पालखी सोहळ्यात कसलीच कमतरता भासणार नाही याची काळजी घेतली जात आहे. बांधकाम विभागाच्या वतीने लोणंद शहरामध्ये येणार्‍या सर्व रस्त्यावरील खड्डे भरणे, साईट पट्टया भरणे, पालखी मार्गावर ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ’मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्र’ उभारणे आदी कामे करण्यात येत आहेत.

पंढरीच्या वारीमध्ये नीरा स्नानाला वेगळे महत्व असून नीरा स्नानाची प्रत्येक वारकर्‍याला ओढ असते. माऊलीचे पवित्र नीरा स्नान पाडेगाव ता. खंडाळा येथील नीरा दत्त घाटावर होणार असून यासाठी नीरा नदीमध्ये व नीरा उजव्या कालव्यात मुबलक पाणी सोडण्याची व्यवस्था जलसंपदा विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. यावर्षी वीर धरणामध्ये मुबलक पाणी असल्याने माऊलीची व वारकर्‍याची नीरा स्नानाची कसलीच गैरसोय होणार नाही. तहसिलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली नीरा नदीवरील दत्तघाटाची चांगली स्वच्छता करण्यात आली आहे. माऊलीचे नीरा स्नान होणार्‍या दत्तघाटाची स्वच्छता, नदीतील शेवाळ काढण्याचे काम पाडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यातआले आहे. पालखी काळामध्ये कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस दलाच्या वतीने वरिष्ठाच्या मार्गदर्शनाखाली लोणंदचे सपोनि सुशिल भोसले योग्य त्या उपाययोजना करत आहेत. सर्व शासकीय विभागासह लोणंदकरांनी देखील माऊलीच्या स्वागताची जंगी तयारी सुरु केली असून लोणंदकरासह संपूर्ण सातारा जिल्हयातील भविकांना माऊलीच्या आगमनाचे वेध लागले आहेत.

माऊलीचे पवित्र नीरा स्नान होणार्‍या दत्तघाट व परिसरात घाट सुशोभीकरणासाठी पाडेगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरीच्या वारीची भितीचित्रे काढण्यात आलेली आहेत. पालखी मार्गावर काढण्यात आलेली पंढरीच्या वारीची ही भिंतीचित्रे लक्षवेधी ठरत आहेत.


Back to top button
Don`t copy text!