15 लाखांसाठी विवाहितेचा जाचहाट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२३: तुला स्वयपाक येत नाही तसेच तु तुझ्या वडिलांकडून 15 लाख रुपये घेवून ये, तुझ्या वडीलास मुंबई येथे घर घेवून देण्यास सांग असे सातत्याने विवाहिता प्रणिता संदीप दुबळे यांना सांगत तिच्यावर चारित्र्याचा संशय घेवून वेळोवेळी तिला मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी करुन तिचा मानसिक जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह सासू, सासरे नणंद आदी 9 जणांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबतची सातारा शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, विवाहिता प्रणिता संदीप दुबळे वय 27 रा. मल्हारपेठ ता. सातारा यांचा विवाह नोव्हेंबर 2017 मध्ये संदीप अंकुश दुबळे रा. मुंबई कल्याण (पुर्व) विजयनगर गवळीनगर भाग्योदय अपार्टमेंट फ्लॅट नं. 4 जि. ठाणे यांच्याशी झाला. त्यानंतर दि. 25 नोव्हेंबर 2020 या दरम्यान तुला स्वयंपाक येत नाही. तसेच तु तुझ्या वडिलांकडून 15 लाख रुपये घेवून ये, तुझ्या वडीलास मुंबई येथे घर घेवून देण्यास सांग असे सातत्याने विवाहिता प्रणिता संदीप दुबळे यांना सांगत तिच्यावर चारित्र्याचा संशय घेवून वेळोवेळी तिला मारहाण करुन शिवीगाळ व दमदाटी करुन तिचा मानसिक जाचहाट केल्याप्रकरणी पती संदीप अंकुश दुबळे वय 36, सासू कौशल्या अंकुश दुबळे वय 60, सासरे अंकुश चंदु दुबळे वय 70 सर्व रा. मुंबई कल्याण (पुर्व) विजयनगर गवळीनगर भाग्योदय फ्लॅट नं.4 तसेच नणंद सविता दिनकर भिसे रा. संगमनगर, ता. सातारा, सुवर्णा गोविंद खुडे रा. टिटवाळा, जि. ठाणे, दिनकर भिसे संगमनगर, ता. जि. सातारा, गोविंद किसन खुडे चेेंबुर टेलीकॉम मुंबई, गिरीष फाळके रा. टिटवाळा जि. ठाणे यांच्याविरुध्द दि. 21 जानेवारी रोजी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहेे. याबाबत अदद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून अधिक तपास पो. हवालदार बी. एस. सणस हे करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!