गोशाळांच्या जमिनीवरील व्यावसायिक दर रद्द; आता कृषी दरानेच होणार दस्त नोंदणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील गोशाळांसाठी जमीन खरेदी, दानपत्र आणि भाडेकराराच्या नोंदणी व्यवहारांवर व्यावसायिक दराऐवजी सवलतीचे कृषी दर लागू करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २२ नोव्हेंबर : राज्यातील गोशाळा चालवणाऱ्या संस्था आणि ट्रस्टना राज्य सरकारने मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. गोशाळांसाठी जमीन खरेदी, दानपत्र किंवा भाडेकरार करताना यापुढे व्यावसायिक दर आकारला जाणार नसून, हे सर्व नोंदणी व्यवहार कृषी दरानेच केले जातील. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात स्पष्ट आदेश दिले असून महसूल विभागाने याचे अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.

मुद्रांक शुल्काचा आर्थिक भार होणार कमी

भटक्या, आजारी आणि अपघातग्रस्त गोवंशाचे संगोपन व चारा लागवड करणाऱ्या गोशाळांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे. यापूर्वी संस्था किंवा ट्रस्टच्या नावावर जमीन घेताना व्यावसायिक किंवा बिनशेती दराने मुद्रांक शुल्क आकारले जात होते. आता कृषी जमिनीच्या मूल्यांकनानुसार ग्रामीण भागात साधारण तीन ते चार टक्के दरानेच शुल्क आकारले जाईल. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयांना या नियमाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

गोशाळा नोंदणीसाठी आवश्यक नियम आणि प्रक्रिया

या सवलतीचा लाभ घेण्यासाठी गोशाळा नोंदणी अर्जासोबत विहित यादीतीलच कागदपत्रे जोडणे आवश्यक असून जमीन संस्थेच्या मालकीची नसल्यास भाडेपट्टा करार जोडणे बंधनकारक आहे. अर्जामध्ये पशुधनाचा तपशील, स्थावर व जंगम मालमत्तेचे मूल्य तसेच मागील तीन वर्षांच्या एकूण उत्पन्न व खर्चाची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच संबंधित संस्थेचे राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणेही अनिवार्य करण्यात आले आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!