दुष्काळी स्थिती आणि प्रशासकीय वेळापत्रकामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाणार ?

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

मतदारयादी पुनर्निरीक्षणाची मुदतवाढ आणि ११ तालुक्यांतील दुष्काळी स्थितीमुळे सातारा जिल्ह्यातील ८७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका २०२७ मध्ये होण्याची शक्यता आहे.

स्थैर्य, सातारा, दि. २२ नोव्हेंबर : मतदारयादीच्या सखोल पुनर्निरीक्षणाची (एसआयआर) वाढलेली मुदत आणि जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्ये जाहीर झालेली दुष्काळी परिस्थिती यामुळे सातारा जिल्ह्यातील ८७१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने आता निवडणुका २०२७ मध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडीमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरणात अनिश्चितता निर्माण झाली आहे.

तालुकानिहाय संख्या आणि प्रशासकांचा कारभार

सातारा जिल्ह्यातील सातारा १२८, कोरेगाव ५६, खटाव ९०, माण ६१, फलटण ८०, खंडाळा ५७, वाई ७६, महाबळेश्वर ४०, जावली ७२, कराड १०४ आणि पाटण १०७ अशा एकूण ८७१ ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. याशिवाय यापूर्वी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची संख्याही मोठी असून, फलटण तालुक्यातच १०० हून अधिक ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर विस्तार अधिकारी प्रशासक म्हणून काम पाहत आहेत.

अंतिम मतदारयादी ३० नोव्हेंबर रोजी

सध्या मुदत संपल्यानंतर अंतिम मतदारयादी ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. अंतिम मतदारयादी जाहीर झाल्यानंतरच ग्रामपंचायत निवडणुकीची प्रत्यक्ष प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तोपर्यंत दुष्काळी स्थिती आणि प्रशासकीय वेळापत्रकामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची चर्चा आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!