
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण दि.15 : सातारा जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चंद्रकांत जाधव यांना राज्य शासनाचा गुणवंत अधिकारी म्हणून पुरस्कार जाहीर झाल्या बद्दल महामित्र पाक्षिक परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, महामित्र परिवाराचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, सहदेव शेंडे, दत्तात्रय शिंदे, मुनिश जाधव, शिवलाल गावडे, शरद कोल्हे, कुंडलीक नाळे, एम. के. भुजबळ, संदिप नाळे, विकास नाळे, शिवाजी भुजबळ, शत्रूघ्न जाधव, चंद्रकांत जाधव, नानासाहेब काळुखे, विजयकुमार जाधव, राजेश बोराटे, मारूती ढगे, गजानन नाळे, राहूल शिंदे, गोंविद घनवट, दिलीप राऊत, संजय नाळे, वैभव नाळे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
