स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नारकर कुटुंबाकडून मंडळाच्या गणपतीची सलग 30 वर्षे सेवा

Team Sthairya by Team Sthairya
December 24, 2020
in Uncategorized
नारकर कुटुंबाकडून मंडळाच्या गणपतीची सलग 30 वर्षे सेवा
ADVERTISEMENT


स्थैर्य, सातारा, दि. २४ : गणपती हे अनेकांचे पूजनीय दैवत आहे, किंबहुना सर्व देवांमध्ये गणेशभक्तांची संख्या सर्वाधिक असण्याचीच दाट शक्यता आहे. गणरायाची सेवा अनेकजण करत असतात. मात्र मंगळवार पेठेतील मंगळवार तळे गणेशोत्सव मंडळाच्या बक्षीसपात्र मूर्तीची 30 वर्षे सेवा अखंडितपणे करणारे नारकर कुटुंबीय याबाबतीत गणरायाच्या भक्तीचा समृद्ध वारसा जपणारे सातारा शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील एकमेव कुटुंब असावे.

दैनिक स्थैर्यच्या अधिकृत WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

1968 साली मंगळवार तळे परिसरातील तत्कालीन तरुणांनी मंगळवार तळे गणेशोत्सव मंडळ नावाचे एक मंडळ स्थापन केले होते. 1980 मध्ये या मंडळाची सूत्रे तत्कालीन तरुणाईकडे आली आणि त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवण्यास सुरुवात केली. 1989 मध्ये एका लग्नपत्रिकेवर छापलेल्या गणपतीच्या चित्रावरून असाच गणपती त्या वर्षी करण्याचे ठरवण्यात आले. त्यावेळी शहरातच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेले के. डी. कुंभार या पंताचा गोटातील मूर्तिकाराकडे हे काम सोपवण्यात आले. विशेष म्हणजे ही मूर्ती एकाच रंगात आणि तीही लाकडाच्या फॉर्ममध्ये तयार करण्यात आली. अर्थात के. डीं. सारख्या जातिवंत कलाकाराने अत्यंत मन लावून काम केल्याने ही मूर्ती अत्यंत देखणी झाली. के. डी. कुंभार हे भवानी विद्यामंदिर येथे कलाशिक्षक होते. त्यांनी असंख्य मूर्ती साकारल्या. त्यातील ही केवळ एकच शाडूची मूर्ती आज अस्तित्वात आहे. योगायोग असा, की त्या वर्षीचे सुंदर मूर्तीचे बक्षीस या मूर्तीला मिळाले. त्यामुळे या मूर्तीचे विसर्जन करू नये असे ठरवण्यात आले आणि ही मूर्ती त्यावर्षी एकाकडे ठेवण्यात आली.

योगायोगाने पुढील वर्षी म्हणजे 1990 साली मंडळाचे एक सक्रिय सभासद उमेश नारकर हे जी. डी. आर्टचे शिक्षण घेवून सातार्‍यात आले. त्यांनी पेठेतील राहत्या घरातच चंदन फोटो स्टुडिओ सुरू केला. त्यावर्षीपासून गणेशोत्सव संपल्यानंतर ही मूर्ती त्यांच्या स्टुडिओत ठेवण्यात आली. त्या वर्षापासून आजअखेर ही मूर्ती त्यांच्या स्टुडिओत आहे. त्यावर्षीपासून या मूर्तीची नारकर कुटुंबीयांकडून दररोज पूजा केली जाते. प्रत्येक चतुर्थीला आरती, 21 मोदकांचा नैवेद्य, प्रत्येक सणाला पुष्पहार आणि गणेश जयंतीला मूर्तीला चांदीचे दागिने घालून अभिषेक, अथर्वशीर्ष आवर्तने, प्रसाद वाटप हे सगळे सोपस्कार पार पाडले जातात. विशेष म्हणजे या सेवेत आजपर्यंत कधीही, कोणत्याही कारणाने खंड पडलेला नाही.

प्रत्येक वर्षी गणपतीचे रंगरंगोटीचे काम उमेश नारकर करतात तर दैनंदिन पूजेचे काम त्यांचे बंधू नितीन नारकर करतात. आता त्यांची दुसरी पिढी या गणरायाच्या सेवेत आहे. नितीन नारकर यांचे चिरंजीवही आता याकामी काका आणि वडिलांना मदत करत आहेत. ज्या काळात गणपतीची शाडूची अगर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती जतन करून ठेवण्याची परंपरा नव्हती त्या काळापासून मंडळाने ही मूर्ती जपली आहे. आजही हीच मूर्ती गणेशोत्सव काळात मंडपात बसवली जाते.

नारकर कुटुंबाकडून गणरायाच्या सेवेत कधीही खंड पडणार नाही, अशी ग्वाही उमेश आणि नितीन या नारकर बंधूंनी दिली आहे.


दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@dailysthairya) जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Tags: सातारा
ADVERTISEMENT
Previous Post

विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्यावतीने ढवळ येथे दोन हजार वृक्षांचे मोफत वाटप

Next Post

वित्तीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृद्धी; सेन्सेक्सने घेतली ३६४ अंकांनी झेप

Next Post
वित्तीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृद्धी; सेन्सेक्सने घेतली ३६४ अंकांनी झेप

वित्तीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वृद्धी; सेन्सेक्सने घेतली ३६४ अंकांनी झेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

मतदानकार्डची PDF कॉपी डाउनलोड करता येणार, जुन्या मतदारांसाठी ही सुविधा 1 फेब्रुवारीपासून होणार सुरू

मतदानकार्डची PDF कॉपी डाउनलोड करता येणार, जुन्या मतदारांसाठी ही सुविधा 1 फेब्रुवारीपासून होणार सुरू

January 26, 2021
विश्वास नागरे पाटील म्हणाले – ‘मोर्चाला परवानगी नाही, तरीही मोर्चा काढल्यास त्यांना रोखले जाईल’

विश्वास नागरे पाटील म्हणाले – ‘मोर्चाला परवानगी नाही, तरीही मोर्चा काढल्यास त्यांना रोखले जाईल’

January 26, 2021
ऍमेझॉन, फ्लिपकार्टसह ई-कॉमर्स कंपन्यांवर व्यापारी संघटनांचा चक्क दरोड्याचा आरोप!

ऍमेझॉन, फ्लिपकार्टसह ई-कॉमर्स कंपन्यांवर व्यापारी संघटनांचा चक्क दरोड्याचा आरोप!

January 26, 2021
पुन्हा एकदा नोटबंदी? १००, १० आणि ५ रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करणार

नोटाबंदीची अफवा : RBI चे स्पष्टीकरण- बंद होणार नाहीत 100, 50 आणि 10 रुपयांच्या जुन्या नोटा

January 26, 2021
शिवसागर जलाशयात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

शिवसागर जलाशयात बुडून दोन तरुणांचा मृत्यू

January 26, 2021
शेतकऱ्यांना राज्यपालांच्या पूर्वनियोजित दौऱ्याची कल्पना दिली होती; राजभवनाकडून स्पष्टीकरण

शेतकऱ्यांना राज्यपालांच्या पूर्वनियोजित दौऱ्याची कल्पना दिली होती; राजभवनाकडून स्पष्टीकरण

January 26, 2021
पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे 31 जानेवारी पर्यंत सुधारीत आदेश जारी

हॉकर्स संघटनेचा पालिकेत मुख्याधिकाऱ्यांना घेराव गांधी मैदानावर चौपाटी सुरू न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

January 26, 2021
“पंजाब म्हणजे पाकिस्तान आहे का ? शेतकऱ्यांबाबत सरकारला कवडीची आस्था नाही” – शरद पवार

‘या राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे, मात्र बळीराजाला भेटायला वेळ नाही’, शरद पवारांची राज्यपालांवर टीका

January 26, 2021
आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण व संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निर्दोष सुटका

आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, दीपक चव्हाण व संजीवराजे नाईक निंबाळकर यांची निर्दोष सुटका

January 26, 2021
साताऱ्यात  साकारणार जैवविविधता उद्यान  पोलीस दलाचे तीस एकत्र क्षेत्र आरक्षीत – अभिनेते सयाजी शिंदे यांची माहिती

साताऱ्यात  साकारणार जैवविविधता उद्यान  पोलीस दलाचे तीस एकत्र क्षेत्र आरक्षीत – अभिनेते सयाजी शिंदे यांची माहिती

January 26, 2021
Load More

आमच्याबद्दल

हे दैनिक मालक, मुद्रक, प्रकाशक प्रसन्न दिलीप रुद्रभटे यांनी प्रसन्न ग्राफिक्स, मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा. फलटण- 415523 (महाराष्ट्र) येथे छापून मालोजीनगर (कोळकी) पो. फलटण, ता. फलटण, जि. सातारा . फलटण-415523 (महाराष्ट्र) येथून प्रकाशित केले. संस्थापक: स्व. दिलीप रुद्रभटे, संस्थापक संपादक : श्रीमती उमा रुद्रभटे. संपादक: प्रसन्न दिलीप रुद्रभटे या अंकात प्रसिध्द झालेल्या मतांशी संपादक सहमत असतीलच असे नाही. वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.

आमचा पत्ता

मुख्य कार्यालय – गणेश – प्रसाद, प्लॉट नंबर १३, मालोजीनगर, कोळकी, ता. फलटण, जिल्हा सातारा

सातारा विभागीय कार्यालय – कला वाणिज्य महाविद्यालय, कोटेश्वर मैदानासमोर, राधिका रोड, सातारा 415002

संपर्क : 7385250270

E-mail ID : [email protected]

  • Home

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • सातारा जिल्हा
    • फलटण
    • सातारा – जावळी – कोरेगाव
    • कराड – पाटण
    • माण – खटाव
    • वाई – महाबळेश्वर – खंडाळा
  • महाराष्ट्र
    • मुंबई – पुणे – ठाणे
    • कोल्हापूर – सांगली
    • सोलापूर – अहमदनगर
    • रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग
    • उर्वरित महाराष्ट्र
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • मनोरंजन
  • खेळ विश्व
  • इतर

Website maintained by Tushar Bhambare.

WhatsApp द्वारे नियमित बातम्या मिळण्यासाठी येथे क्लिक करा.