अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने सोन्याच्या दरात घट


 

स्थैर्य, मुंबई, २४ : अमेरिकी डॉलरमध्ये सुधारणा झाल्याने मागील आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर ०.२ टक्क्यांनी कमी झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी सांगितले. त्यामुळे सुरक्षित असलेल्या पिवळ्या धातूकडे कल दिसून आला. युरोझोनमधील रखडलेली वसुली व अमेरिकी धोरणकर्त्यांची चिंता वाढत असूनही सलग दोन आठवडे तोटा होऊनही सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत.

अमेरिकी फेडरल रिझर्व्हने २८ आणि २९ जुलै २०२० रोजी झालेल्या धोरणात्मक बैठकीत सुधारणेसाठी खडतर मार्ग सुचवला होता. अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून आणखी प्रोत्साहनपर आधाराची गरज असल्याचे सांगितले. त्यामुळे सोन्याच्या किंमतीतील घसरण मर्यादित राहिली. तसेच १५ ऑगस्ट २०२० रोजी संपलेल्या आठवड्यात अमेरिकेत १० लाखांहून अधिक बेरोजगारीचे दावे दाखल झाल्यानेही सोन्याच्या किंमतींना काहीसा आधार मिळाला.

कच्चे तेल : अमेरिकी यादीत घसरण झाल्याने मागील आठवड्यात कच्च्या तेलाचे दर ०.८ टक्क्यांनी वाढले. चीनतच्या वाढत्या मागणीमुळेही कच्च्या तेलाच्या किंमतींना आधार मिळाला. चीनच्या सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी ऑगस्ट ते सप्टेंबर २०२० पर्यंत अमेरिकेच्या कच्च्या तेलाचे २० दशलक्ष बॅरल वाहून आणण्यासाठी टँकर्स बुक केल्याचे अमेरिकेचे तेल व्यापारी, जहाज बांधणी करणारे आणि चिनी आयातदारांनी दिलेल्या वृत्तानुसार समजते.

कोव्हिड-१९ च्या नव्या प्रसारामुळेही तेलाच्या किंमती दबावाखाली राहिल्या. तसेच अस्थिर अशा तेल बाजाराची गती कमी केली. प्रचंड वादळामुळे मेक्सिकोचे काही भाग ठप्प झाल्याने कच्च्या तेलाचे उत्पादन बंद झाले. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींना आधार मिळाला.

बेस मेटल्स : एलएमई बेस मेटलच्या किंमती मागील आठवड्यात सकारात्मक स्थितीत होत्या. तसेच झिंकला सर्वाधिक नफा झाला. अमेरिका आणि चीन संबंधातील तणाव निवळत असल्याने तसेच चीनच्या अर्थव्यवस्थेत मोठी सुधारण होण्याच्या अपेक्षेमुळे औद्योगिक धातूंच्या किंमती वाढू शकतात. चीनने जुलै २०२० मध्ये वाहन विक्रीतील वाढ आणि कारखान्यातील कामकाजात भरपूर सुधारणा दर्शवल्याने धातूचा सर्वात मोठा ग्राहक असलेल्या चीनच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचे संकेत मिळाले.

तांबे :एलएमईवरील कमी होणाऱ्या यादीमुळे तांब्याचे दर वाढले. एलएमई तांब्याच्या किंमती २ टक्क्यांनी वाढल्या. मात्र विषाणूच्या वाढत्या प्रसारामुळे वाढीवर मर्यादा आल्या तसेच जागतिक आर्थिक स्थितीवर मळभ निर्माण झाले. तांब्याच्या यादीत घसरण होत असल्याने एलएमई प्रमाणित वेअअरहाऊस लाल धातूंच्या किंमतीला आधार देईल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!