
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, फलटण : पुसेगावकडुन येणारे रोडने झडकबाईचीवाडी, ता. फलटण येथे रोडवर अपघात झाला असुन मोटार सायकलवरील जखमी इसम बेशुध्द अवस्थेत आहे. सदरील इसमावर लाईफलाईन हॉस्पिटल येथे उपचार चालू असून त्याचे नाव व गाव समजुन आलेले नाही. त्याची बजाज सी टी १०० मो. सा. असुन त्याचा नंबर एम एच ४३ एम १३९ असा आहे. तरी सदरचा इसम आपले हदीतील असलेस पोलीस स्टेशनला कळवावे, असे आवाहन फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक नितीन सावंत यांनी केलेले आहे.
