माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाची पहिली साखर बाहेर; पूजन करून उजळला शुभारंभ

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

उमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामातील साखरेच्या पहिल्या पाच पोत्यांचे पूजन करून नव्या हंगामाचा औपचारिक प्रारंभ झाला.

स्थैर्य, बारामती, दि. १३ : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा प्रारंभ झाल्यानंतर प्रत्यक्ष साखर उत्पादनाला सुरुवात झाली आहे. कारखान्यात तयार झालेल्या साखरेच्या पहिल्या पाच पोत्यांचे व लक्ष्मीचे पारंपरिक पद्धतीने पूजन करून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भावनांना वंदन करत नव्या हंगामाची अधिकृत सुरुवात करण्यात आली.

अडचणींवर मात करून उद्दिष्ट पूर्ण करणार

याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले. चालू हंगाम आव्हानात्मक आणि अडचणीचा असला तरी सर्व सभासद, कामगार आणि संचालक मंडळ एकजुटीने संकटावर मात करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याचे निर्धारित उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

प्रशासकीय अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती

साखर पूजनाच्या या सोहळ्यास व्हाईस चेअरमन नितीन शेंडे, संचालक गणेश खलाटे, विजय तावरे, शिवराज राजे जाधवराव, रतन कुमार भोसले, सतीश फाळके, मच्छिंद्र मुलमुले यांच्यासह कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जितेंद्र रणवरे, वर्क्स मॅनेजर वाबळे, चीफ केमिस्ट श्रीकांत पाटील, स्टोअर किपर सुरेश देवकाते आणि गोडाऊन प्रमुख जगताप यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!