सचिन पाटलांना फलटणमधुन आमदार करा; विकासासाठी कटिबद्ध : उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. २७ ऑक्टोबर २०२४ | फलटण | फलटण कोरेगाव मतदार संघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आपण कटिबद्ध असून आत्ता होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमधून सचिन कांबळे पाटील यांना आमदार म्हणून निवडून पाठवा. फलटणच्या विकासासाठी आम्ही सर्वच जण कटिबद्ध आहोत; असे मत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी व्यक्त केले.

बारामती येथे उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सचिन कांबळे पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री ना. पवार बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे – पाटील व श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी सचिन कांबळे – पाटील यांचा परिचय करून दिला व मनोगत व्यक्त केले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!