उपजिल्हा रुग्णालयात 100 बेड उपलब्ध करा

भारतीय युवा पँथरची मागणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । 3 जून 2025। फलटण । फलटण शहरा बरोबर तालुक्यातील अनेक गोरगरीब रूग्णांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात वाढती रूग्णसंख्या पाहता 100 बेड ची आवश्यकता आहे. त्याच बरोबर, ट्रामा केअर सेंटरचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडे पाठवावा, अशी मागणी भारतीय युवा पँथरकडून करण्यात आली.

प्रातांधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपजिल्हा रुग्णालयात 100 बेड सुविधा देणे सध्या गरजेचे आहे. तसेच ट्रामा केअर सेंटर, सिटीस्कॅन, सोनोग्राफी, आदी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. रिक्त डॉक्टर, परिचारिका यांची पदे त्वरीत भरावीत. या मागण्या 15 दिवसात पूर्ण न झाल्यास विभागीय दंडाधिकार्‍यांच्या दालनासमोर आंदोलन करण्यात येणार आहे.

यावेळी लक्षण काकडे, अजित मोरे, दादा कांबळे, राहुल गुंजाळ सोनु इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते

Back to top button
Don`t copy text!