राज्य शासनाचा मोठा निर्णय; ‘पाठशाळा व संस्कृत विकास’ योजना बंद, अर्थसंकल्पीय तरतूदही थांबवली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने अकार्यक्षम ठरलेल्या ‘पाठशाळा व संस्कृत विकास’ आणि ‘इतर विशेष शाळा’ या योजना अधिक्रमित करून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्थैर्य,सातारा, दि. १० ऑक्टोबर : राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारित असलेल्या योजनांचा सर्वंकष आढावा घेतल्यानंतर राज्य शासनाने ‘पाठशाळा व संस्कृत विकासासाठी अनुदाने’ तसेच ‘इतर विशेष शाळा’ या दोन महत्त्वाच्या योजना अधिक्रमित करून बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी दीर्घ कालावधीपासून झालेली नसल्याचे आणि त्यांची सद्यःस्थितीतील उपयुक्तता मर्यादित झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

वर्षांनुवर्षे एकही रुपया खर्च नाही

शालेय शिक्षण विभागाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, पाठशाळा आणि संस्कृत विकासासाठी अनुदाने या योजनेंतर्गत २०१९-२० ते २०२५-२६ या कालावधीत कोणताही निधी खर्च झालेला नाही. तसेच २०१७-१८ पासून या योजनेसाठी एकही नवा प्रस्ताव प्राप्त झालेला नाही. दुसरीकडे, इतर विशेष शाळा योजनेंतर्गत २०२२-२३ ते २०२५-२६ दरम्यान एक रुपयाचाही खर्च झालेला नाही. भरीव अर्थसंकल्पीय तरतूद उपलब्ध नसणे आणि मुख्य उद्दिष्टांशी सुसंगत इतर योजना आधीपासूनच कार्यान्वित असणे यामुळे या योजना बंद करण्याची शिफारस करण्यात आली होती.

प्रशासकीय खर्च आणि तरतुदींवर पूर्ण बंदी

शासनाने या दोन्ही योजना तातडीने बंद करण्याचे आदेश दिले असून, यापुढे या योजनांच्या नावाने कोणतीही अर्थसंकल्पीय तरतूद करू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. याशिवाय या योजनांच्या नावाखाली कोणताही प्रशासकीय खर्च मंजूर केला जाऊ नये, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे शिक्षण विभागातील अकार्यक्षम योजनांना पूर्णविराम मिळाला आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!