सीबीएसई ‘प्रायव्हेट’ परीक्षेसाठी नोंदणी सुरू; ‘या’ विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षेची थेट संधी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) १० वी आणि १२ वीच्या प्रायव्हेट उमेदवारांसाठी ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

स्थैर्य,सातारा, दि. १० ऑक्टोबर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) २०२७ मध्ये होणाऱ्या १० वी आणि १२ वीच्या वार्षिक बोर्ड परीक्षेसाठी प्रायव्हेट (खासगी) उमेदवारांचे परीक्षा अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. नियमित शाळेत न जाता थेट बोर्डाची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या, श्रेणीसुधार (Improvement) करू इच्छिणाऱ्या किंवा कम्पार्टमेंट आलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी आहे. पात्र उमेदवारांना सीबीएससीच्या cbse.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहे.

पात्रतेचे निकष आणि उमेदवारांच्या श्रेणी

सीबीएससीच्या नियमांनुसार, २०२१ ते २०२६ या कालावधीत नापास किंवा ‘एन्सेशियल रिपीट’ घोषित झालेले विद्यार्थी प्रायव्हेट उमेदवार म्हणून अर्ज करू शकतात. याशिवाय, गुण वाढवण्यासाठी ‘इम्प्रूव्हमेंट ऑफ परफॉर्मन्स’ देऊ इच्छिणारे उत्तीर्ण विद्यार्थी, प्रथम किंवा द्वितीय संधीतील कम्पार्टमेंट विद्यार्थी आणि अतिरिक्त विषय (Additional Subject) घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याची मुभा आहे. दिल्लीत राहणाऱ्या महिला आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष सवलतीअंतर्गत प्रायव्हेट म्हणून बसण्याची परवानगी दिली जाते.

अर्जाची मुदत आणि परीक्षा शुल्क

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी २३ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह मुदत देण्यात आली आहे. यानंतर २४ ते ३० ऑक्टोबर दरम्यान २,००० रुपये अतिरिक्त विलंब शुल्कासह (Late Fee) अर्ज सादर करता येईल. अर्जासाठी प्रतिविषय शुल्क निश्चित करण्यात आले असून, प्रात्यक्षिक (Practical) परीक्षा असलेल्या विषयांसाठी अतिरिक्त शुल्क लागू असेल. अर्जदारांना पासपोर्ट आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि पूर्वीचे गुणपत्रक अपलोड करणे बंधनकारक आहे.

परीक्षेचे स्वरूप आणि गुण पद्धत

प्रायव्हेट विद्यार्थ्यांना शाळा उपस्थितीची (Attendance) अट लागू नसते. त्यांची प्रात्यक्षिक परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन (Internal Assessment) गुण हे सीबीएससीच्या नियमांनुसार जुने गुण पुढे वापरून किंवा नवीन नियुक्त केंद्रांवर प्रात्यक्षिक परीक्षा घेऊन दिले जातात. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये ही मुख्य परीक्षा पार पडणार आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!