
थेट WhatsApp वर मिळवा
सोन्या आणि चांदीच्या दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक वृत्त असून, ऐन लग्नसराईच्या तोंडावर सोने व चांदीच्या दरातकिंचित घसरण पाहायला मिळाली आहे. सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्यासह २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे भाव थोडे उतरले असून चांदीच्या दरातही नरमाई आली आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १६ नोव्हेंबर : देशांतर्गत सराफा बाजारात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या चढ-उतारानंतर आज सोन्या-चांदीच्या किंमतीत हलकी घसरण नोंदवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा दर १ लाख ३७ हजार ६१० रुपयांच्या आसपास आला आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १ लाख २६ हजार १४० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. याशिवाय, चांदीच्या दरातही किंचित घट होऊन भाव प्रति किलो १ लाख ९४ हजार ९०० रुपयांवर आले आहेत.
प्रमुख शहरांमधील आजचे सोन्याचे दर
मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांमध्ये २२ कॅरेट सोन्याचा प्रति १० ग्रॅमचा भाव १,२६,१४० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३७,६१० रुपये आहे. राजधानी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा दर १,२६,२९० रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर १,३७,७६० रुपयांवर पोहोचला आहे. बाजारातील या किरकोळ घसरणीमुळे ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी खरेदी करताना त्यावर जीएसटी आणि इतर कर लागू होणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.





