स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

महापरिनिर्वाण दिन : अनुयायांच्या सुविधेसाठी प्रशासन सज्ज

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून व्यवस्थेचा आढावा

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
December 3, 2022
in देश विदेश

दैनिक स्थैर्य । दि. ०३ डिसेंबर २०२२ । मुंबई । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमी येथे येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी राज्य शासन, सामाजिक न्याय विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, पोलीस यंत्रणा सज्ज आहे. डॉ. बाबासाहेबांच्या अनुयायांना सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात येतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. अनुयायांनी शिस्तबद्ध दर्शन घेऊन शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क येथे उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या सुविधांचा पालकमंत्री श्री. केसरकर यांनी आढावा घेतला. यावेळी अपर पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव श्री. डिंगळे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त रमाकांत बिरादार, सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे, नागसेन कांबळे, चैत्यभूमी नियोजन समितीचे महासचिव रमेश जाधव आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. केसरकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दर्शनासाठी येणाऱ्या अनुयायांकरिता उपलब्ध केल्या जाणाऱ्या सुविधांची पाहणी केली. दर्शन रांगेत पिण्याच्या पाण्याची तसेच बिस्किटांची सोय, आरोग्य सुविधा, उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी आच्छादन आणि कार्पेट टाकण्याची सूचना त्यांनी केली. फिरती स्वच्छतागृहे, थंडीपासून बचावासाठी ब्लँकेटची व्यवस्था आदींचाही आढावा घेत उपयुक्त सूचना केल्या. शिवाजी पार्क येथे अनुयायांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी ५० हजार चौ. फूट जागेत वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आले आहेत. येथे आलेल्या अनुयायांची श्री. केसरकर यांनी भेट घेऊन व्यवस्थेबाबत त्यांच्याशी आस्थेवाईकपणे संवाद साधला.

महानगरपालिकेमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सोयी सुविधांचे ६० टक्के काम पूर्ण झाले असून येत्या दोन दिवसात उर्वरित काम पूर्ण होईल. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी चैत्यभूमी परिसरात सहा पोलीस उपायुक्तांसह सुमारे १५०० पोलीस तैनात करण्यात येणार आहेत. अनुयायांच्या सोयीसाठी विविध संस्थांचे स्वयंसेवक देखील मदत करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत तात्पुरती निवारा व्यवस्था, टेहळणी मनोरा व नियंत्रण कक्ष, भोजन मंडप, माहिती कक्ष, आरोग्य सेवा, बांबूचे संरक्षक कठडे, क्लोज सर्किट टिव्हीद्वारे चैत्यभूमी येथील थेट प्रक्षेपण, विद्युत रोषणाई, ध्वनीक्षेपक व्यवस्था, फिरती शौचालये, स्नानगृहे, कचरापेट्यांची व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व बिस्कीटची व्यवस्था, रांगेतील अनुयायांसाठी तात्पुरते छत व आसन व्यवस्था आदी सोयी सुविधा पुरविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.


Previous Post

शरयुचा एकरकमी २७७५ रुपये दर जाहीर

Next Post

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने योगदान द्यावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

Next Post

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाने योगदान द्यावे – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

ताज्या बातम्या

कुलगुरु डॉ. दिलीप मालखेडे यांच्या निधनाबद्दल राज्यपालांना दुःख

January 28, 2023

छत्रपती शिवाजी कॉलेजेमध्ये शहीद वीर व राष्ट्रनिर्मात्याना मानवंदना

January 28, 2023

बौद्धजन पंचायत समितीच्या गट क्र. २२ च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

January 28, 2023

“तुम्ही तुमच्या मुलाची जागा वाचवली तरी पुरे”; संजय राऊतांचे CM एकनाथ शिंदेंना आव्हान

January 28, 2023

कीर्तन परंपरेचा आजच्या काळात नव्याने अभ्यास होणे गरजेचे – प्रा. डॉ. धनंजय होनमाने

January 28, 2023

भारतीय बौद्ध महासभा अंकुर बौद्ध विहार शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न

January 28, 2023

प्रजासत्ताक दिनी आटपाडीत प्रथमच सागर यांनी केली सत्यशोधक वास्तू पूजन

January 28, 2023

पारसिक बोगद्यामुळे प्रवासातील वेळेत बचत होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

January 28, 2023

भ्रष्टाचारमुक्तीचा संकल्प करा – हेमंत पाटील

January 28, 2023

विद्यार्थ्यांनो हसत खेळत परीक्षेला सामोरे जा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

January 28, 2023
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Privacy Policy
  • Contact us

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण
  • सातारा जिल्हा
  • बारामती
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • Contact us
  • Privacy Policy

Website maintained by Tushar Bhambare.

Don`t copy text!