दर्शन घेण्यासाठी महालक्ष्मी आणि जोतिबा चरणी भाविकांची रीघ


 

स्थैर्य, कोल्हापूर, दि.१७: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे मागील आठ महिन्यापासून बंद असलेल्या महालक्ष्मी मंदिरात आज सकाळी भक्तांना पाडव्याच्या मुहूर्तावर दर्शन घेण्यासाठी प्रवेश देण्यात आला. यावेळी भाविकांची रीघ लागली होती. पुन्हा एकदा भाविकांच्या गर्दीने कोल्हापूर फुलले असल्याचे चित्र दिसून आले.

करवीर निवासिनी महालक्ष्मी व दख्खनचा राजा जोतिबा ही दोन प्रमुख मंदिरे शासन निर्णयानुसार आज सकाळी पाडव्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी देवदर्शनाची ओढ लागल्याने सकाळपासूनच भाविकांची पावले मंदिराकडे वळली.

अल्पावधीतच भाविकांची गर्दी वाढत गेली. पहाटेच मंदिरात निर्जंतुकीकरण, स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. सॅनिटायझर, मास्क, सोशल डिस्टन्स या नियमावलीचे काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे. असे देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी सांगितले. दिवाळीच्या सुट्टीत हजारो भाविक येण्याची शक्यता असली तरी दररोज दोन ते तीन हजार भाविकांना दर्शनासाठी सोडले जाणार असून सहा फुटांचे सामाजिक अंतर ठेवले जाणार आहे, असे जाधव यांनी सांगितले. याशिवाय देवस्थान समिती अंतर्गत ३०४२ मंदिरात सुद्धा भाविकांना दर्शनाची सोय केली असल्याचेही त्यांनी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!