माढा लोकसभेचा उमेदवार लवकरच घोषित होणार?

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य‌ | दि. १२ मार्च २०२४ | फलटण | आगामी काही दिवसांवर लोकसभा निवडणूक आलेली आहे. येणाऱ्या काही दिवसात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे. अद्यापही महायुती व महाविकास आघाडीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार घोषित झालेले नाहीत. येणाऱ्या काही तासांमध्ये लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार घोषित होणार असल्याची शक्यता माढा लोकसभा मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

आज महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेनेची दिल्ली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. सदर बैठक झाल्यानंतर आज माढा लोकसभा मतदारसंघाची महायुतीची उमेदवारी घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यासोबतच महाविकास आघाडीची सुद्धा मुंबई येथे बैठक असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून लवकरात लवकर माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवारी घोषित होणार असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!