LPG सिलिंडर बुकिंगच्या नियमात मोठा बदल; ग्राहकांना दिलासा

एलपीजी सिलिंडर बुकिंगच्या ४५ दिवसांच्या प्रतीक्षा कालावधीचा नियम रद्द करण्यात आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्थैर्य,सातारा, दि. ०८ सप्टेंबर : केंद्र सरकारने स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडर (LPG) बुकिंगबाबतच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे. रिफिल सिलिंडर बुकिंगसाठी असलेला ४५ दिवसांच्या अनिवार्य प्रतीक्षा कालावधीचा (वेटिंग पिरियड) नियम आता हटवण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी गॅस ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून, आता आवश्यकतेनुसार नवीन सिलिंडर बुक करणे शक्य होणार आहे.

४५ दिवसांच्या नियमातून सुटका

यापूर्वी इंधनाचा तुटवडा आणि गैरवापर रोखण्याच्या उद्देशाने दोन सिलिंडर बुकिंगदरम्यान ४५ दिवसांचे अंतर ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, अनेक कुटुंबांमध्ये एका महिन्यातच सिलिंडर संपत असल्याने ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. तेल कंपन्यांनी वितरणाचा आढावा घेऊन आणि पुरवठा साखळी सुरळीत झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा नियम शिथिल केला आहे.

ग्राहकांना कसा होणार फायदा?

नवीन नियमांनुसार ग्राहकांना आता गरजेनुसार लगेचच दुसरा सिलिंडर बुक करता येणार आहे. विशेषतः मोठ्या कुटुंभांना आणि सण-उत्सवांच्या काळात गॅसची अतिरिक्त गरज भासणाऱ्या ग्राहकांसाठी हा निर्णय अत्यंत सोयीचा ठरणार आहे. गॅस बुकिंगची प्रक्रिया आणि वितरण अधिक पारदर्शक व जलद व्हावे, यासाठी तेल कंपन्यांकडून डिजिटल प्रणाली अधिक मजबूत केली जात आहे.

 

 

Back to top button
Don`t copy text!