साहित्यकृतीचे वाण लूटा


मकरसंक्रांती नंतर रथसप्तमी पर्यंत महिला वर्गात हळदी कुंकूवाचे सांस्कृतिक आयोजन केले जाते. त्यानिमित्त भेटणे, बोलणे, वाण आदन – प्रदान होऊन नाते व मैत्र स्नेह वाढीस लागतो. एकमेकींना आधार व वैचारिक देवाणघेवाण तसेच चांगल्या कृतीची नोंद होते.

आपण काळानुसार वाण साहित्यात बद्दल करुन चांगल्या दर्जेदार साहित्यकृतीचे वाण वाटप केल्यास वैचारिक मकर संक्रमण होऊन वाचन संस्कृती वाढीस चालना मिळेल. वाण नाही, पण गुण लागला असे म्हणे योग्य होईल. संसारोपयोगी वाण बाजूला ठेऊन ज्ञानेश्वरी, हरिपाठ, दासबोध, तुकाराम गाथा, ग्रामगीता, अग्निपंख, श्यामची आई, छावा, मृत्यूजंय इ. सह कथा, काव्य, कादंबरी, ललित, प्रवासवर्णन, वैचारिक, विनोदी, वैज्ञानिक, संतसाहित्य, आत्मचरित्रे वाड्मय प्रकारे वाणाची लयलूट करणे उचित होईल.

ग्रंथ वाण हीच खरी जगण्याची खाण

आपलाच साहित्य वाणीकार ​– प्रा. रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!