चौधरीवाडीत कृषीकन्यांनी बनवला शेतकर्‍यांचा व्हाट्सअप ग्रुप


दैनिक स्थैर्य । 24 जून 2025 । फलटण । येथील फलटण एज्युकेशन सोसायटी अंतर्गत कृषी महाविद्यालयातील चतुर्थ वर्षातील कृषी कन्यांनी चौधरवाडी येथे शेतकर्‍यांच्या सोयीसाठी व्हाट्सप ग्रुप बनविला.

या व्हाट्सग्रुपद्वारे शेतीशी संबंधित बातम्या आणि माहिती नियमितपणे शेअर तसेच शेतकर्‍यांसाठी कृषी योजना, बाजारभाव, हवामान अंदाज, तसेच इतर आवश्यक माहिती शेतकर्‍यांपर्यंत जलद पोहोचवणे. गावोगावी असे ग्रुप तयार करून, शेतकर्‍यांना एकाच ठिकाणी माहिती उपलब्ध करून दिली जाते. यामुळे, शेतकर्‍यांना वेळेवर माहिती मिळून, त्यांच्या कामात सुलभता येते. कृषीकन्या शेतकर्‍यांच्या समस्यांवर चर्चा करतात. तंत्रज्ञान आणि पद्धतींबद्दल माहिती देतात. विद्यार्थ्यांना शेतीत काय शिकायला मिळत आहे, याबद्दल माहिती देतात. शेती संबंधित उपयुक्त माहिती: उदाहरणार्थ, खते, बियाणे, कीटकनाशके आणि सरकारी योजनांची माहिती देतात.
नवीन तंत्रज्ञान: ड्रोन वापरून शेती, आधुनिक सिंचन पद्धती. सरकारी योजना: प्रधानमंत्री पीक विमा योजना, किसान क्रेडिट कार्ड योजना,शेतीविषयक बातम्या: नवीन वाण, हवामान अंदाज,शेतकर्‍यांचे अनुभव: पिकांची लागवड, कीड नियंत्रण,या व्हाट्सअप ग्रुप मुळे शेतकर्‍यांबरोबर संवाद साधने सोपे झाले आहे.

यावेळी कृषीकन्या कुमारी जाधव, सृष्टी लडकत, प्रणोती कांबळे, सानिका कांबळे, रोहिणी कदम, स्नेहा काटकर, प्रतीक्षा मलगुंडे या कृषी कन्या सहभागी झाल्या होत्या.

या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण व उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश साळुंखे व प्रा. नितिशा पंडित, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभणार आहे.


Back to top button
Don`t copy text!