
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २२ जुलै २०२४ | फलटण | येथे “लोकमान्य बाळ गंगाधर टिळक” यांची जयंती उद्या दि. २३ जुलै रोजी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते शंकर मार्केट येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संपन्न होणार आहे.
तरी सदरील कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे; असे आवाहन लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
