
स्थैर्य, फलटण, दि. २३: कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटणच्या आवारातील साप्ताहिक भूसार बाजारात आज रविवार दि. २३ मे रोजी ज्वारी आवक १२ क्विंटल दर प्रति क्विंटल १५०० ते २००० रुपये, बाजरी आवक १० क्विंटल दर प्रति क्विंटल १३५० ते १५१६ रुपये, गहु आवक ३४ क्विंटल दर प्रति क्विंटल १७०० ते १९०० रुपये, हरभरा आवक ५८ क्विंटल दर प्रति क्विंटल ४४०० ते ५००० रुपये, मका आवक ३१ क्विंटल दर प्रति क्विंटल १५५० ते १६११ रुपये, खपली आवक ७ क्विंटल दर प्रति क्विंटल ४४११ रुपये निघाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली आहे.