स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांची धडक कारवाई – चार मोटर सायकल जप्त, मोटर सायकल चोरीचे 3 गुन्हे उघड

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि. २४ सप्टेंबर २०२१ । सातारा । खिंडवाडी ता.सातारा येथे स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून दोन दुचाकीचोरांना ताब्यात घेतले असून 3 गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी संशयितांकडून 4 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत.

याबाबत माहिती अशी, दि. 22 रोजी खिंडवाडी, ता. जि. सातारा येथे दोन संशयित दोन मोटर सायकल विक्री करण्यास येणार असल्याची माहिती एलसीबीला मिळाली. यांनतर पथकाने खिंडवाडी येथे सापळा लावून दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकुण 2 मोटर सायकली जप्त केल्या. त्यांची कसून चौकशी करून चोरलेल्या आणखी दोन मोटर सायकल त्यांच्या घराजवळुन जप्त केल्या. या मोटारसायकली सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे तपासात स्पष्ट झाले. एक मोटर सायकलबाबत अद्याप माहिती उपलब्ध झाली नाही. आरोपींना सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!