शाळा सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेणार- शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, दि.२०: महाराष्ट्रातील शैक्षणिक
संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला
आहे.शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा
सुरू कराव्यात, अशा सूचना शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिल्या
आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव
असलेल्या जिल्ह्यातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट
विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे
आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशाही सुचना देण्यात आलेल्या
आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक
प्रशासनाचा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

प्रत्यक्ष
वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन शिक्षण पद्धती चालूच राहणार आहे. कोरोना
महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण
विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड
यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!