चोराडे येथे विनापरवाना बैलगाडी शर्यतीचे आयोजन


 

चोराडे येथे बेकायदेशीर आयोजित बैलगाडी शर्यतीत जप्त केलेल्या साहित्यासह सपोनि उत्तम भापकर पोलीस कर्मचारी प्रशांत पाटील, काळेल आदी

स्थैर्य, औंध, दि.२०: चोराडे ता खटाव येथे बेकायदेशीर बैलगाडी शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल बैलगाडी चालक मालक यांच्यावर औंध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.त्यांच्याकडील दोन वाहने छकडा असा अंदाजे पाच लाख सात हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी सकाळी 10:30 वाजता चोराडे गावच्या हद्दीत भांडमळा नावाच्या शिवारात गायरानातील मोकळ्या जागेत युवराज गुलाबराव पिसाळ रा.चोराडे ता खटाव,योगेश अंजीर लाटे रा.वाई ता वाईयांनी बेकायदा बिगर परवाना बैलगाडी शर्यतीचेआयोजन केले होते.या शर्यतीत बैलगाडी चालक मालक विष्णू साहेबराव यादव वय 37 वर्षे रा. भाकरवाडी ता कोरेगाव,नवनाथ बाबूराव पिसाळ वय 40 वर्षे, सचिन शांताराम जाधव वय 25 वर्षे, मयुरेश मनोहर पिसाळ वय 24 वर्षे तिघे राहणार चोराडे ता खटाव,ऋषिकेश विश्वास साळुंखे वय29 वर्षे, नवनाथ मारुती जगताप वय 38 वर्षे, दोघे रा. माळवाडी ता कराड, यांनी कोर्टाच्या आदेशाचा अवमान करून बैलगाडी शर्यतीला बंदी असताना शर्यतीचे आयोजन करून बैलांना बेदम मारहाण करणे, शेपूट चावणे मास्क न घालता कोरोनाचा संसर्ग पसरवण्याचा प्रयत्न केला केल्याबद्दल पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. प्राण्यांची वाहतूक करण्यासाठी दोन वाहने छकडा असे पाच लाख सात हजाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!