लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी लष्कराच्या उपप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारली

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि.०२ फेब्रुवारी २०२२ । नवी दिल्ली । महाराष्ट्राचे सुपूत्र ले. जनरल मनोज पांडे पीवीएसएम, एवीएसएम, वीएसएम  यांनी आज  लष्कराचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांच्याकडून लष्कराच्या उपप्रमुखपदाची आज सूत्रे स्वीकारली, ले.ज.  मोहंती सोमवारी 31 जानेवारी 2022 रोजी सेवानिवृत्त झाले.

ले. ज. पांडे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे माजी विद्यार्थी असून, डिसेंबर 1982 मध्ये कोअर  ऑफ इंजिनियर्स (द बॉम्बे सॅपर्स) मध्ये नियुक्त झाले होते. जनरल ऑफिसर म्हणून त्यांनी जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील संवेदनशील पल्लनवाला क्षेत्रात ऑपरेशन पराक्रम दरम्यान इंजिनीअर रेजिमेंटचे नेतृत्व केलेले आहे. ते स्टाफ कॉलेज, कॅम्बरली (युनायटेड किंगडम)चे पदवीधर आहेत.  त्यांनी हायर कमांड (एचसी) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेज (एनडीसी) अभ्यासक्रमांचे  शिक्षण घेतलेले आहे.

आपल्या 39 वर्षांच्या  कारकिर्दीत, त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडताना महत्त्वाच्या आणि आव्हानात्मक पदांवर काम केलेले आहे. यामध्ये वेस्टर्न थिएटरमधील स्ट्राइक कोरच्या इंजिनिअर  ब्रिगेड कमांड, जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ पायदळ ब्रिगेड, पश्चिम लद्दाखच्या उंचावरील माउंटन विभाग,  ईशान्येतील  कॉअर, कमांडर-इन-चीफ अंदमान आणि निकोबार कमांड (CINCAN) आणि पूर्व कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ तसेच दक्षिण कमांडचे चीफ-ऑफ-स्टाफ अशा अतिशय महत्वाच्या पदांचा कार्यभार सांभाळला आहे.

ले. जनरल यांच्या लष्कारातील उल्लेखनीय सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक, तसेच लष्करप्रमुखांकडून आणि जीओसी-इन-सी  ( GOC-in-C) कडून उत्तम कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलेले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!