भाऊसाहेब महाराजांच्या समाजाभिमुख कार्याचा आदर्श पुढे अखंड चालवू- आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले


स्थैर्य,सातारा, दि. ४: सातारा तालुक्यात कृषी- औद्योगिक विकासाबरोबरच हरीत क्रांती घडवून आणण्यासाठी आदरणीय स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे तथा भाऊसाहेब महाराज यांनी अथक परिश्रम घेतले. सर्वसामान्य जनतेच्या सुख- दुख:त एकरुप होवून त्यांनी आपल्या रयतेशी अखंडपणे जिव्हाळ्याचे नाते जपले. त्यांचे कृपाछत्र आपणा सर्वांवर वटवृक्षाप्रमाणे सदैव राहिले असून त्यांच्या अमूल्य स्मृती जपत त्यांच्या समाजाभिमुख विकासकार्याचा आदर्श आपण पुढे चालवीत आहोत, असे प्रतिपादन अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
सातारा तालुक्याचे भाग्य विधाते, अजिंक्य उद्योग समुहाचे शिल्पकार व अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी सहकारमंत्री स्व. श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या १७ व्या स्मृतीदिनानिमीत्त अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित अभिवादनाच्या कार्यक‘मप्रसंगी आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्‍वास शेडगे, कार्यकारी संचालक संजीव देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती श्रीमती वनिता गोरे, राजू भोसले, सदस्य प्रा.शिवाजीराव चव्हाण, प्रतिक कदम, अनिल देसाई, बाजार समितीचे सभापती विक‘म पवार, पंचायत समितीच्या सभापती सौ. सरिता इंदलकर, सदस्या सौ. छाया कुंभार, माजी सभापती धर्मराज घोरपडे, जितेंद्र सावंत, आशुतोष चव्हाण, आनंदराव कणसे, राहूल शिंदे, दयानंद उघडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी कारखाना कार्यस्थळावरील स्व. भाऊसाहेब महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार, पुष्पचक‘ अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी बोलताना आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले की, मध्यंतरीच्या काळात साखर कारखानदारीवर अनेक संकटे आली पण, भाऊसाहेब महाराजांच्या आशिर्वादामुळे आणि सभासद, कार्यकर्त्यांच्या सहकार्याने कारखान्याचे कामकाज प्रगतीपथावर ठेवू शकलो. अशीच उत्तरोत्तर प्रगती यापुढेही निरंतर वृध्दींगत करण्यासाठी आपण स्व. भाऊसाहेब महाराजांनी घालून दिलेल्या आदर्श वाटचालीवर जिद्दीने कार्यरत राहूया. सहकारमहर्षी स्व. भाऊसाहेब महाराजांनी सातारा तालुक्यातच नव्हे तर, संपूर्ण महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात केलेल्या विकासाचे अनेक पैलू समाजासमोर आहेत. सातारा परिसराच्या विकासासाठी त्यांनी दूरदृष्टी ठेवून केलेले कार्य डोळे दिपवून टाकणारे आहे. अजिंक्य उद्योग समुहाचे संस्थापक, महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री असलेल्या भाऊसाहेब महाराजांनी सातारा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडूण आल्यानंतर अनेक प्रकारे विकासाची महत्वपूर्ण कामे केलेली आहेत. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त हेतूने त्यांनी या भागाच्या विकासाचा ध्यास घेवून चौङ्गेर विकास साधला. अल्पावधीतच त्यांनी उभे केलेले विकासाचे विश्‍व पाहिले की, भलेभले आश्‍चर्यचकीत होतात. आजही त्यांच्या सुसंस्कृत राजकारणाचे उदाहरण आवर्जून दिले जाते. सातारा शहरामध्ये १९९३ मध्ये संपन्न झालेल्या साहित्य संमेलनामुळे तर संपुर्ण साहित्य चळवळ भारावून केली होती, हे एक जागते उदाहरण आहे. साहित्य संमेलनाचे नेटके आयोजन व नियोजन करुन त्यांनी साहित्य क्षेत्रात राजसत्तेची ताकद उभी केली होती, त्यामुळेच त्यांचा आजही जाणता राजा म्हणून उ‘ेख केला जातो.
समाजनिष्ठा हा त्यांचा व्यक्तीत्वाचा स्थायी भाव होता. आपण ज्य समाजात जन्मलो त्या समाजातील दिनदुबळ्या आणि अशिक्षीत व हलाखीचे जीवन जगणार्‍या लोकांसाठी आपण आपले आयुष्य खर्ची घातले पाहिजे, असे ध्येय बाळगणार्‍या स्व. भाऊसाहेब महाराजांनी हे ध्येय साध्य करण्यासाठीच संपूर्ण जीवन खर्ची घातले. ग‘ामजीवन समृध्द करण्यासाठी भाऊसाहेब महाराजांनी एक व्यापक चळवळ उभारली. खेड्यापाड्यातील जनसामान्य या चळवळीच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. भाऊसाहेब महाराजांनी डोळ्यासमोर ठेवलेले उद्दीष्ट ङ्गलदायी ठरले. ग‘ामीण भागातील जनसामान्यांचे जीवन समृध्द करण्यासाठी स्व. भाऊसाहेब महाराजांचे अखंड परिश्रम चालू असायचे हे सर्वश्रूत आहे. भाऊसाहेब महाराजांची दृष्टी केवळ पारदर्शक नव्हे तर, थेट भविष्याचे वेध घेणारी होती. आपल्या सामाजिक वाटचालीत स्व. भाऊसाहेब महाराजांनी शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक क‘ांती घडविणारा अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना स्थापन केला. आज तोच अजिंक्यतारा कारखाना हजारो शेतकर्‍यांच्या विकासाची मुहुर्तमेढ ठरला. आयुष्यभर जनकल्याणासाठी झटणार्‍या, जनसंस्कृतीचे सक्षण करणार्‍या भाऊसाहेब महाराजांच्या जनकल्याणी स्मृतीला अभिवादन करुन यापुढेही त्यांनी दाखवलेल्या जनहिताच्या मार्गावार चालून जनकल्याण साधूया, असे आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
स्व.भाऊसाहेब महाराजांच्या पुण्यस्मृती दिनानिि’त्त लिंब येथील सप्तक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थेमार्ङ्गत महाराष्ट्राच्या संस्कृतीचे व संतपरंपरेचे दर्शन घडवणारा संगीतमय अविष्कार भजनाचा कार्यक‘म संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष संजय वर्णेकर, सचिव किरण सावंत, हरी चव्हाण, ओमकार लोहार, सचिन सावंत, तुषार पवार-, सोमनाथ गोरे आदीभजनी मंडळीनी हा कार्यक‘म सादर केला. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अजिंक्यतारा शिक्षण संस्थेच्या माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी ‘भाऊसाहेब महाराज अशा शब्द स्वरूपामध्ये आदरांजली अर्पण केली. सदर कार्यक‘मास कारखान्याचे सर्व संचालक सदस्य, तसेच अजिंक्य उद्योग समुहातील सर्व संस्थांचे आजी व माजी पदाधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रकाश बडेकर, सौ. कांचन साळुंखे, माजी उपाध्यक्ष रविंद्र कदम, ज्ञानेश्‍वर गायकवाड, गणपतराव शिंदे, शिवाजीराव सावंत, नारायण साळुंखे, दिलीप ङ्गडतरे, सुनील काटे, धनाजी शेडगे, सुर्यकांत धनवडे, पदमसिंह ङ्गडतरे, हभप बाबामहाराज गजवडीकर, बाळकृष्ण ङ्गडतरे, उत्तमराव नावडकर, बळीराम देशमुख, पंडीतराव सावंत, गणपतराव मोहिते, धनवे, जयदीप शिंदे, अजय शिर्के, ज्ञानदेव रांजणे, सयाजी कदम, ऊस तोडणी वाहतूक कंत्राटदार, मजूर तसेच सभासद, सातारा व जावली तालुक्यातील असं‘य कार्यकर्ते, अक्यितारा कारखान्याचे अधिकारी व कामगार-कर्मचारी, अजिंक्यतारा शिक्षण संस्था व एबीआयटी कॉलेजचे सर्व पदाधिकारी,शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या सं‘येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!