दुचाकीवरून गुटखा वाहतूक करणारा गजाआड, करंजे येथे एलसीबीची कारवाई : 84 हजारांचा मुद्देमाल जप्त


स्थैर्य, सातारा, दि.७: करंजे येथील महानुभाव मठाजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून गुटख्याची चोरटी वाहतूक करणार्‍यास पकडले. त्याच्याकडून गुटखा व साहित्य मिळून 84 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
मोळाचा ओढा बाजूने एकजण दुचाकीवरून (एमएच 11 सीएस 3284) एका पोत्यामध्ये गुटखा घेवून विक्रीला जात असल्याची खबर  स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर दि. 5 रोजी सायंकाळी 6.15च्या सुमारास पथकातील पोलीस अंमलदार महानुभाव मठ करंजे सातारा येथे जावून सापळा लावून थांबले. यावेळी संशयीत दुचाकीवरून पोत्यामध्ये हिरा पान मसाल्याचे 90 पुडे व रॉयल तंबाखूचे 89 पुडे (हिरा गुटखा) असा घेवून जाताना मिळून आला. त्याच्या ताब्यातून हा माल व इतर साहित्य असा एकुण 84 हजार 756 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शाहुपूरी पोलीस ठाण्यास गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या सूचनाप्रमाणे व एलसीबीचे पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे, सहायक फौजदार तानाजी माने, जोतीराम बर्गे, पो.हवा. अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, पो. ना. शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, प्रमोद सावंत, निलेश काटकर, अमित सपकाळ, विशाल पवार, रोहित निकम, सचिन ससाणे, पंकज बेसके यांनी केली.

Back to top button
Don`t copy text!