स्थैर्य
Advertisement
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result
स्थैर्य
No Result
View All Result

स्मार्टफोन पॉवर बँक रेंटल सेवा ‘स्पाईक’ लॉन्च

Team Daily Sthairya by Team Daily Sthairya
March 9, 2021
in इतर

स्थैर्य, मुंबई, दि.९: देशातील डिजिटायझेशनला अधिक वेग देत, जस्ट डायलचे सह संस्थापक रमाणी अय्यर यांनी ‘स्पाइक’ नावाची स्मार्टफोन पॉवर बँक भाड्याने (रेंटल) देण्याची सेवा नव्याने सुरु केली आहे. श्री अय्यर हे दूरद्रष्टे असून त्यांनी जस्टडायलसह अनेक भविष्यातील उद्योगांची सह स्थापना केली आहे. आता जगभरातील सर्वात मोठी स्मार्टफोन पॉवर बँक भाड्याने देणारी कंपनी होण्याचे उद्दिष्ट साकारण्याचे त्यांनी ठरवले आहे. फक्त ६ महिन्यातच स्पाइकने भारतातील विस्तृत स्मार्टफोन पॉवर बँक भाड्याने देण्याचे नेटवर्क उभारले आहे. सध्या भारतभरात ते ११ शहरांमधील ८००० ठिकाणी लाइव्ह उपलब्ध आहे.

सध्याच्या घडीला, स्पाइक बंगळुरू, मुंबई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, चेन्नई, कोलकत्ता, कोईम्बतूर, चंदिगड, लखनौ, जयपूर आणि पुण्यात ही सेवा सुरु आहे. कंपनी सध्या वेगाने विकास करत असून लवकरच आणखी अनेक शहरात विस्तार करण्याच्या तयारीत आहे. या स्टेशनची उभारणी, ज्या ठिकाणी खूप गर्दी असते, तेथे होते. उदा. मेट्रो स्टेशन्स, सिनेमा, कॅफे, मॉल, एअरपोर्ट्स, रेल्वे स्टेशन्स, कॉर्पोरेट ऑफिसेस, टेक पार्क्स, हॉटेल्स, युनिव्हर्सिटीज आणि रुग्णालये इत्यादी. लोकांना अगदी सहजपणे स्पाइक पार्टनर आउटलेटवर जाऊन क्यूआर कोड स्कॅन करून पॉवर बँक भाड्याने घेता येते. कंपनीच्या पॉवर बँक  वापरण्यास सोप्या असून त्यासोबत मायक्रो-यूएसबी, टाईप सी आणि अॅपल प्रमाणित लाइटनिंग केबल्स येतात. एकदा वापरल्यानंतर ही पॉवर बँक जवळच्याच स्पाइक स्टेशनवर परत करता येते.

श्री अय्यर हे एक ध्येयवादी उद्योजक असून त्यांनी जस्टडायल तयार करण्यास मदत केली तीचे मूल्य १.८ अब्ज डॉलर्स इतके आहे. आता जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन पॉवर बँक भाड्याने देणारी इंडस्ट्री या स्पाइकच्या दृष्टीकोनावर ते भर देत आहेत. हे वेगाने विकास पावणारे क्षेत्र असून पुढील काही वर्षात त्याचे मूल्य १५ अब्ज डॉलर्स होण्याची अपेक्षा आहे. बाजारपेठेत सिंहाचा वाटा उचलण्याचे स्पाइकचे उद्दिष्ट आहे. हे करताना ‘डिजिटल इंडिया’ आणि ‘स्टार्टअप इंडिया’ यासह अनेक भारतीय आकांक्षांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट यामागे आहे.

श्री रमाणी अय्यर म्हणाले, “भारतातील संधी आणि ट्रेंड्स याबद्दल मी आशावादी आहे. या उद्योगात तीन मोठे ट्रेंड भरपूर पाठबळ देत आहेत. यात डिजिटल/ तंत्रज्ञान सोल्युशन स्वीकारण्यसाठी भारतातील खूप खुले वातावरण, भारतीय तरुणांद्वारे मोठ्या प्रमाणावर स्वीकारली जाणारी ‘शेअरिंग इकॉनॉमी’, स्मार्टफोनचा वेगाने वाढणारा ग्राहक वर्ग यांचा समावेश आहे. आता मागील वर्षात फोनचा वापर दुपटीने वाढला असल्याने स्मार्टफोनच्या बॅटरीवरील दबाव अभूतपूर्व वेगाने वाढला आहे. इथेच स्पाइकची निर्मिती झाली. स्पाइक वापरल्याने कुणाचीही बॅटरी संपणार नाही. म्हणूनच, फक्त मागील ६ महिन्यात आम्ही भारतातील ११ शहरांमध्ये वेगाने विस्तार केला. भारतातील सर्वात मोठा पॉवर बँक रेंटल बिझनेस होण्यासाठी आमचे ३५०० भागीदार आणि ८००० पेक्षा जास्त चार्जिंग स्टेशन कार्यरत आहेत”.


📣 दैनिक स्थैर्य आता टेलिग्रामवर आहे. दैनिक स्थैर्यच्या अधिकृत टेलिग्राम चॅनेलला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करावे.

ADVERTISEMENT
Previous Post

ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी, भाजपाचे ‘आक्रोश’ आंदोलन

Next Post

डॉटपेच्या डिजिटल शोरुमचा वेगाने विस्तार

Next Post

डॉटपेच्या डिजिटल शोरुमचा वेगाने विस्तार

ताज्या बातम्या ई-मेलवर मिळवा

Join 1,026 other subscribers

जाहिराती

ताज्या बातम्या

कोरोना निर्बंध काळात बियाणे, खते, निविष्ठा पुरवठ्याच्या तक्रारींसाठी राज्यस्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित

April 16, 2021

‘ट्रॅक्टर आमचा डिझेल तुमचे योजना’ राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांच्या पुढाकाराने सुरू

April 16, 2021

पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर केली सातारा शहराची पहाणी

April 16, 2021

गडकरी, फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळेच नागपुरातील स्थिती आटोक्यात – भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक

April 16, 2021

पंढरपूर पोट निवडणुक : नागरिकांना मतदानासाठी प्रवास करण्याबाबत सूचना

April 16, 2021

भारतातील ऍडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टिम्स

April 16, 2021

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ‘एएनएस कॉमर्सची’ उपाययोजना

April 16, 2021

एक देश एक रेशन कार्ड योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी

April 16, 2021

खावटी अनुदान सर्व गरजू आदिवासी कुटुंबांना द्यावे – आमदार विनोद निकोले

April 16, 2021

साताऱ्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता ७८ बेडची नवीन सुविधा उभारणी; पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली जागेची पाहणी

April 16, 2021
Load More

सूचना

दैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने / जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी अथवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधुन अथवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार अथवा जाहिरातदारच आहे.वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले, वादविवाद, प्रकरणे फलटण न्यायालयांतर्गतच चालवले जातील. अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.

  • Home
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.

No Result
View All Result
  • मुख्य पान
  • फलटण शहर
  • फलटण तालुका
  • सातारा जिल्हा
  • प्रादेशिक
  • संपादकीय
    • अग्रलेख
    • लेख
    • विशेष लेख
  • देश विदेश
  • इतर
  • संपर्क

Website maintained by Tushar Bhambare.