लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरण सुविधेचा शुभारंभ


स्थैर्य, फलटण दि.15 : फलटण शहरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरण सुविधेचा शुभारंभ प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला. यावेळी डॉ.शिवाजीराव जगताप यांच्या हस्ते धन्वंतरी पूजन करण्यात आले. डॉ.पार्श्‍वनाथ राजवैद्य, डॉ. संजय राऊत, डॉ. मेघना बर्वे, डॉ. सागर गांधी, डॉ. राजेश फडे यांच्यासह हॉस्पिटल अधिकारी/कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.

दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत नावनोंदणी करुन लसीकरण करण्यात येणार आहे. 60 वर्षावरील स्त्री पुरुष तसेच 45 वर्षावरील मधुमेह, रक्तदाब व तत्सम आजार असणार्‍या स्त्री पुरुष नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.


Back to top button
Don`t copy text!