गं.भा. यमुनाबाई ग्यानबा पवार यांचे निधन


स्थैर्य, फलटण दि.15 : येथील विशेष कार्यकारी अधिकारी तथा महाराजा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष, पत्रकार युवराज पवार यांच्या आज्जी गं.भा. यमुनाबाई ग्यानबा पवार (वय100 वर्षे)रा.पवार गल्ली फलटण यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्‍चात 5 मुले, 1 मुलगी, सुना, जावई ,नातवंडे असा मोठा परिवार आहे. गं.भा. यमुनाबाई ग्यानबा पवार यांनी अतिशय कष्टातून आपले कुटुंबातील मुलांना शिक्षित करून महत्वाचा ठिकाणी नोकरी व व्यवसायास लावले. त्यांच्या अंत्यविधीसाठी राजकीय,सामाजिक शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!