
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, सातारा, दि.१६: कृष्णानगर येथील कडा कॉलनीतील जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचार्यांच्या शासकीय निवासस्थानाच्या सुमारे एक लाख पाच हजार 300 रुपयांच्या खिडक्या व दरवाजे चोरल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तींवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत डॉ. संजय नारायण गायकवाड (रा. जिल्हा रुग्णालय) यांनी याबाबत शहर पो लिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक मछले तपास करत आहेत.
