वाईच्या भरवस्तीतील गर्ल्स हायस्कूलची इमारत पाडली


स्थैर्य, सातारा, दि.१६: इमारत धोकादायक असल्याचे कारण पुढे करून  ब्राम्ह समाज मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी शहराच्या मध्यवस्तीत असलेली गर्ल्स  हायस्कूलचे शालेय साहित्य रस्त्यावर काढून शाळेचे काही वर्ग पाडले.  याबाबत शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका यांनी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे  धाव घेतली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी निवेदनाव्दारे के ली आहे.

श्री.स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या शिक्षण संस्थेने वाई ब्राम्ह  समाज मंडळ यांच्याकडून रविवार पेठ येथील बांधीव जागा भाडेतत्वावर  घेतलेली आहे. संस्थेचा भाडेकरार अद्याप बाकी आहे. संस्थेमार्फत या जागेत  गर्ल्स हायस्कूल चालवले जाते. करोना टाळेबंदीनंतर शासनाने 15 तारखेपासून  सर्व शाळा, कॉलेजेस सुरु करण्यात यावेत असे जाहीर केले. दरम्यानच्या काळात ब्राम्ह समाज मंडळाचे अध्यक्ष मीनल साबळे व राजेंद्र साबळे यांनी वाई  पालिकेतील अधिकार्‍यांना हाताशी धरुन दि. 20 रोजी सदर इमारत धोकादायक  असल्याची नोटीस पाठविली. मात्र या इमारतीत कोणतेही वर्ग भरत नाहीत.  त्यानंतर संस्थेस देखील अशाच प्रकारची नोटीस पाठवण्यात आली. त्यासंदर्भात  संस्थेशी पत्रव्यवहार सुरू होता. दरम्यान, शाळेच्या इमारतीमध्ये काहीतरी काम  सुरू असल्याचे समजल्याने त्याठिकाणी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून गेले असता  ब्राम्ह समाज मंडळाच्या पदाधिकार्‍यांसमवेत काही कामगार शाळेच्या  इमारतीतील शालेय साहित्य बाहेर काढून इमारतीचा राडारोडा ट्रक्टरमध्ये भरत असल्याचे दिसले. मंडळाच्या अध्यक्षांना शाळेचे साहित्य बाहेर का काढताय  असे मुख्याध्यापकांनी विचारले असता तुम्ही यात पडू नका तुम्हाला महागात  पडेल, असा दम देवून तेथून हाकलून लावण्यात आले.

शनिवार, रविवार या दोन दिवसांत सुट्टीचा फायदा घेत शाळेतील शैक्षणिक सा हित्य बाहेर काढण्यात आले, त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान शाळेचे झालेले  आहे. याबाबत संस्थेच्या सचिवांशी संपर्क साधला असता त्यांनी पोलिस  ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. त्यानुसार पोलिस ठाण्यात गेले असता पो लिसांनी त्याची दखल घेतली नाही असे प्रभारी मुख्याध्यापिका रेखा ठोंबर यांनी  पोलिस अधिक्षकांना दिलेल्या निवदेनात म्हटले आहे. मंडळाच्या अध्यक्षांवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी केली असून अन्यथा शाळेतील  मुख्याद्यापक, शिक्षक सर्व मुलींसह रस्त्यावर उतरून आंदोलन करणार  असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

पालिकेतील काही अधिकार्‍यांना हाताशी धरून शाळेला खोटी नोटीस देण्यास  भाग पाडून ब्राम्ह समाज मंडळाच्या पदाधिका-यांनी मुलींच्या शिक्षणाचा विचार  न करता शाळेची इमारत खाली केली. शाळेच्या साहित्याची तोडफोड करून  नुकसान केले. गरीब व गरजू मुलींच्या शिक्षणाचा मार्ग बंद केला. मोठया  संख्येने या शाळेत शिक्षण घेणार्‍या मुलींना आता कुठे बसवायचे हा मोठा यक्ष  प्रश्‍न संस्थेपुढे उभा राहिला आहे, या सर्व मुलींना शाळेच्या इमारती समोर  असणार्‍या रस्त्यावर बसवून न्याय मिळे पर्यंत ज्ञानदानाचे काम करणार  असल्याचे प्रभारी मुख्याध्यापक रेखा ठोंबरे यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!