निंबोडीच्या लखन शेळके-पाटीलची भारतीय हवाई दलात निवड; लोणंदमध्ये सत्कार

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

निंबोडी येथील लखन विलास शेळके-पाटील याची भारतीय हवाई दलात निवड झाली आहे. लोणंद येथे समाज बांधवांच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला. वाचा सविस्तर.

स्थैर्य, लोणंद, दि. १२ डिसेंबर : ग्रामीण भागातील तरुणाने जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश संपादन केले आहे. निंबोडी येथील लखन उज्वला विलास शेळके-पाटील याची भारतीय हवाई दलात (Indian Air Force) निवड झाली आहे. या यशाबद्दल लोणंद येथे समाज बांधवांच्या वतीने त्याचा विशेष सत्कार करण्यात आला.

मार्गदर्शन आणि यश

लखन शेळके याने लोणंद येथील ‘स्वरूप अकॅडमी’मध्ये प्रशिक्षण घेतले होते. येथे त्याला भिसे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. अवघ्या ८ महिन्यांच्या प्रशिक्षणातून आणि मार्गदर्शनातून त्याने हे यश संपादन केले आहे. त्याच्या या निवडीमुळे निंबोडी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

मान्यवरांची उपस्थिती

लखनच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी आयोजित सत्कार समारंभास समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी दशरथ धायगुडे, किरण गोवेकर, विलास शेळके, नितीन सुळ, आदिनाथ महाराज धायगुडे, रोहन धायगुडे, गणेश कोळेकर, अमोल गोवेकर, नवनाथ शेळके, डॉ. प्रताप गोवेकर, अभय गोवेकर, किशोर गोवेकर, गणेश गोवेकर, नारायण गोवेकर, युवराज गोवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उपस्थितांनी लखनला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!