फलटणच्या अधिकारगृहांमधील स्वच्छतागृहांची दूरवस्था

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ११ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण येथील शासकीय अधिकारगृहांमध्ये असलेल्या स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या अधिकारगृहांमध्ये कामासाठी रोज येणार्‍या शेकडो नागरिकांची या स्वच्छतागृहांतील अस्वच्छतेमुळे कुचंबना होत आहे. या स्वच्छतागृहांचा वापर करणे महाकठीण काम झाले आहे.

दरम्यान, आपल्या कामातून वेगळी ओळख निर्माण करणारे फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी फलटणच्या या अधिकारगृहांमध्ये असणार्‍या स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेबाबतच्या प्रश्नामध्ये लक्ष घालून ही समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. फलटण तहसील कार्यालय, फलटण प्रांत कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, बांधकाम विभाग जिल्हा परिषद, यासोबतच पुरवठा विभाग व न्यायालयांमध्ये येणार्‍या शेकडो नागरिकांना या स्वच्छतागृहांच्या दूरवस्थेचा सामना करावा लागत आहे.

फलटणच्या या अधिकारगृहांमध्ये जर एखादी महिला कामासाठी आली तर तिला सुध्दा स्वच्छतेच्या या गंभीर समस्येचा सामना करावा लागत आहे.


Back to top button
Don`t copy text!