
दैनिक स्थैर्य । दि. २६ मे २०२२ । बारामती । महा ऑरगॕनिक ॲन्ड रेश्युड्युफ्री फार्मर्स असोशिएशन अर्थात मोर्फा, आत्मा पुणे, कृषीविभाग बारामती व कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली सेंद्रिय शेतीमधिल किड व रोगांचे नियंत्रण या विषयी ‘बांधावरील प्रयोगशाळा’ हि दोन दिवसाची कार्यशाळा सुरु करण्यात आली.
सदर कार्यशाळेचे उद्घाटन श्रीमती आशाताई अनंतराव पवार, यांच्या हस्ते व सौ. शर्मिलाताई पवार यांच्या मातोश्री सौ. लताताई प्रतापसिंह पाटिल व डॉ. दिपा वानखेडे, मोर्फा चे अध्यक्ष कृषिभूषण अंकुश पडवळे, सचिव प्रल्हाद वरे, केव्हिके चे प्रमुख डॉ धिरज शिंदे, डॉ. रतन जाधव, संतोष गोडसे हे प्रमुख उपस्थितीत होते.
सेंद्रिय शेती तज्ञ डॉ. संतोष चव्हाण यांनी कार्यशाळेत सविस्त बांधावर सेंद्रिय शेती करताना किड व रोगांचे नियंत्रण जैविक पध्दतीने कसे करायचे हे सविस्तर प्रेझेटेंशन च्या माध्यमातून सांगितले.
सदर कार्यक्रमास श्री वैभव तांबे सो Sdao बारामती, सौ सुप्रीया बादंल (शिळीमकर) Tao बारामती,आत्मा चे विश्वजित मगर व गणेश जाधव तसेच मोर्फा चे संचालक कल्याण काटे, संजय देशमुख, अमरजित जगताप, सुरेखा जाधव, आश्विनी लाड, नितीन तावरे, प्रल्हाद बोरगड, विशाल पावडे, गोवर्धन भुतेकर, हरिभाऊ यादव, सुभाष पाटिल, संजय गांवडे, अजय शिपलकर, योगेश सरप, सुरेंद्र चव्हाण, विशाल खटकाळे, विराज सस्ते, मोर्फा चे राज्यभरातील संचालक उपस्थितीत होते