
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य । दि. ७ जुलै २०२१ । मुंबई । माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंग आणि नाशिक जिल्ह्यातील युवा नेता यतीन रावसाहेब कदम हे बुधवार ७ जुलै रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत. यतीन कदम हे निफाड विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार रावसाहेब कदम यांचे पुत्र असून नाशिक जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. हा कार्यक्रम दुपारी १२ वाजता भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयात होणार आहे.
