दैनिक स्थैर्य | दि. १० मार्च २०२३ | फलटण |
श्रीराम एज्युकेशन सोसायटीच्या श्री जानाई हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, राजाळे येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांना पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांचे जीवन तसेच त्यांनी केलेले कार्य याविषयी माहिती देण्यात आली व त्यांचा आदर्श वारसा, विचार आजच्या विद्यार्थिनींनी आत्मसात करावेत, असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य नेरकर सर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते.