
स्थैर्य, कोळकी, दि. २३: सध्या फलटण तालुक्यासह कोळकी जिल्हा परिषद गटामधील गावांमध्ये कोरोना रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. कोरोना रूग्णांनी गृह विलगीकरणा पेक्षा संस्थामक विलीगीकरणात दाखल झाले तर कोरोनाची साखळी तोडण्यास नक्कीच मदत होणार आहे. म्हणूनच कोळकी जिल्हा परिषद गटासाठी विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून झिरपवाडी, ता. फलटण येथील फुलाई गार्डन मंगल कार्यालयामध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. कोळकी जिल्हा परिषद गटामधील कोरोनाबाधितांनी विलगीकरण कक्षामध्ये दाखल होवुन उपचार घ्यावेत. यामुळे स्वतः सह आपल्या कुटुंबातील सर्वांची सुध्दा काळजी घ्यावी असे आवाहन फलटण पंचायत समितीचे सदस्य सचिन रणवरे यांनी केलेले आहे.
झिरपवाडी, ता. फलटण येथे सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये प्राथमिक वैद्यकीय उपचार केले जाणार असुन स्थानिक डॉक्टरांच्या सहकार्याने येथील रूग्णांची तपासणी सुध्दा करण्यात येणार आहे. या सोबतच दाखल होणार्या रूग्णांना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून चहा, नास्ता व जेवण हे मोफत देण्यात येणार आहे, असेही पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे यांनी स्पष्ट केले.