कोल्हापूर आयर्नमॅनचा ‘ओम’ मानकरी


दैनिक स्थैर्य | दि. १५ सप्टेंबर २०२३ | बारामती |
कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने १० सप्टेंबर रोजी कोल्हापूर हाल्फ आयर्नमॅन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये १८ ते ३० वयोगटात बारामती सायकल क्लबचा ओम सावळे-पाटील याने प्रथम क्रमांक मिळवला.

सदर स्पर्धेत १.९ किलोमीटर पोहणे, ९० किलोमीटर सायकलिंग व २१ किलोमीटर पळणे हे तिन्ही क्रीडाप्रकार ४ तास व ५६ मिनिटात ओमने पूर्ण केले. राज्यभरातून ११० स्पर्धेकांनी भाग घेतला होता. सर्व वयोगटातील गुणांनुसार ओव्हर ऑल दुसरा क्रमांक ओम यांनी पटकाविला आहे.

कोल्हापूर स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष डॉ. प्रदीप पाटील, संचालक चैतन्य चव्हाण, विजय कुलकर्णी व इतर मान्यवरांच्या हस्ते ओमला सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी कोल्हापूर स्पोर्ट्स अकॅडमी, कोल्हापूर अ‍ॅथलेटिक क्लबचे सदस्य उपस्थित होते.

कोल्हापूर येथील स्पर्धेमुळे आत्मविश्वास वाढला असून राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी या स्पर्धेच्या टायमिंगचा महत्त्वपूर्ण उपयोग होणार असल्याचे ओम सावळे-पाटील यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!