
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, फलटण, दि.१: संपूर्ण राज्यात करोना संक्रमीत रुग्णांची वाढ होत असून सर्वांनी आपली स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमालीचे काटेकोरपणे पालन करुन कोळकीकरांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन कोळकी ग्रामपंचायतीचे उपसरपंच संजय कामठे यांनी केली आहे.
कोरोनाने अनेकांना आपल्यातून हिरावून नेले आहे. त्यामुळे सर्वांनीच पूर्वीपेक्षा अधिक काळजी घेवून सार्वजनिक जीवनात वागले पाहिजे. त्यासाठी माझे कुटुंब, माझी जबाबदारी ह्यासारख्या शासन निर्देशांचे पालन करणे आवश्यक आहे. घरातून बाहेर पडताना मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा, बाहेरुन आल्यावर हात पाय साबणाने स्वच्छ धुवावेत. स्वत:ची व आपल्या कुटूंबाची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही संजय कामठे यांनी केले आहे.
